मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडकेने अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नेबर्स, डायट लग्न, सॅड सखाराम यांसारख्या अनेक कलाकृतींमध्ये तो झळकला आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेसृष्टीतही त्याने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटात त्याने साकारलेली डेव्हिड ही भूमिका प्रचंड गाजली होती. आता ‘दृश्यम २’ नंतर तो पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तशी माहिती त्याने नुकतंच एका मुलाखतीत दिली आहे. (Siddharth Bodke in Bollywood Film)
सिद्धार्थने नुकतंच ‘मुंबई टाईम्स’ला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तो त्याच्या नव्या बॉलिवूड प्रोजेक्टसंदर्भात बोलला आहे. सिद्धार्थचा पहिल्या चित्रपटाचं शूटिंग काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं आहे. तर दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे, सिद्धार्थचा पहिल्या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडमधील बड्या बॅनरअंतर्गत होत असून ज्यात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर एक चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असल्याचे बोलला आहे.
‘दृश्यम २’मधील भूमिका गाजल्यानंतर सिद्धार्थची दोन नव्या चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला, “दृश्यम २’नंतर मला पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळते. एका मोठ्या बॅनरने माझ्या या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. तर दुसरा चित्रपट प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. त्यातील एका चित्रपटात मी प्रमुख भूमिका साकारत असल्याने मी खूप उत्सुक आहे.”
हे देखील वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, सलमान खानसह अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबर केले होते काम
या दोन्ही चित्रपटांची माहिती देताना तो पुढे म्हणाला, “मला हे दोन्ही चित्रपट ‘दृश्यम २’ मधील डेव्हिडमुळे मिळाली. निर्मात्यांनी माझी ही भूमिका पाहून मला या भूमिकेसाठी विचारलं होतं. माझी प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील शूटिंग ऑगस्टमध्ये झाली, तर दुसऱ्या टप्प्याचं शूट लवकरच सुरू होईल. तर दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकचं शूट येत्या ऑक्टोबरअखेर सुरू होणार आहे.”
हे देखील वाचा – “तिथे आमटी भात आणि…”, महिनाभर अमेरिकेमध्ये राहिलेल्या अमृता देशमुखला आला असा अनुभव, म्हणाली, “काही लोक असे आहेत की…”
यावेळी त्याच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “माझी मुख्य भूमिका असलेला चित्रपट विशेष असून त्यात साकारणारी भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. माझी ही व्यक्तिरेखा मिर्झापूरची असून तेथील भाषा शिकणं, त्या भाषेचा लहेजा पकडणं माझ्यासाठी फार अवघड होतं. त्यामुळे ती भाषा अवगत करण्यासाठी शूटिंगदरम्यान मी ती भाषा शिकलो, त्याचा अभ्यास केला. आमच्या दिग्दर्शकाशी माझी सतत चर्चा सुरू असायची. त्यामुळे मला ही भाषा येऊ लागली. मी या दोन्ही चित्रपटात जी भूमिका साकारणार आहे, त्या भूमिकेच्या संवादांमध्ये सहजता आणि खरेपणा आणण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही तो यावेळी बोलला आहे.