शिव शंकराच्या गळ्याभोवती असलेल्या नागाला खूप मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये नागाची मनोभावे पूजा केली जाते. नागाला दूध दिले जाते, नाग डुक धरुन बसतो असेही अनेकदा म्हणते जाते. असेच देशात नाग व नागिनीबद्दल अनेक समज-गौरसमजदेखील आहेत. त्यामधील एक म्हणजे नाग व नगिन हे बदला घेतात. पण यापैकी नक्की काय खरं आणि काय खोटं? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. याबद्दल विज्ञान काय सांगते? याचीदेखील माहिती आपण जाणून घेऊया. (snake attack reason)
नागाच्या किंवा नागिणीच्या शेपटीवर पाय पडला तर नाग लगेच चावा घेत नाही तर तर नंतर तो बदला घेतो असे अनेकदा म्हणतात. मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. नागाची स्मरणशक्ती खूप कमी असते. तो त्याच्या इंद्रियांवर अवलंबून असतो. कोणत्याही व्यक्तीला ओळखण्याची क्षमता नागामध्ये नसते. तसेच साप, नाग हे एकमेकांशी संवाद करण्यासाठी फेरोमोनचा उपयोग करतात. तसेच जेव्हा साप मारला जातो तेव्हा एका विशिष्ट प्रकारचा फेरोमोन सोडतो. हे फेरोमोन इतर सापांना संकेत देतात की इथे धोका आहे.
विज्ञानाच्या मते सापांमध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती नसते. तो केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी अन्नाच्या शोधात असतो त्यामुळे तो हल्ला करतो. पण नाग व नागिनीच्या काही कथा आहेत ज्यामध्ये प्राण्यांमध्ये एक वेगळीच शक्ती असल्याचे समजते. तसेच नाग बदला घेतो हे एक मिथ्य आहे. त्यांच्यामध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती नसते आणि ते निसर्गानुसार काम करतात.
दरम्यान हापुड येथील सरदपुर येथील गावातील लोकांना सापाने अनेकांना चावा घेतला होता. त्यामुळे नागिन बदला घेत असल्याचेही अनेकांनी म्हंटलं होतं. एकाच घरातील पाच जणांचा सापाने चावा घेतला. मात्र नंतर वन्य विभागाकडून सापाला पकडण्यात आले होते. लोकांना नागाने चावा घेतल्याचे बोलले गेले मात्र तो नाग नसून साप असल्याचे सांगितले होते.