सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘डॉन ३’मधून शाहरुख खानचा पत्ता कट, रणवीर सिंग दिसणार मुख्य भूमिकेत, नेटकरी संतापले, म्हणाले, “शाहरुख नसेल तर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 8, 2023 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
don 3 announced

‘डॉन ३’मधून शाहरुख खानचा पत्ता कट, रणवीर सिंग दिसणार मुख्य भूमिकेत, नेटकरी संतापले, म्हणाले, “शाहरुख नसेल तर...”

बॉलीवूड अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तरने नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची घोषणा करताना फरहानने एक व्हिडिओ शेअर केलं आहे. मात्र हा व्हिडिओ शेअर होताच ‘डॉन-3’ चित्रपट येणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असून चित्रपटाबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर सध्या रंगताना दिसत आहे. (Don 3 Movie Announced)

फरहान अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘3 : A NEW ERA BEGINS’ असं लिहिलेलं दिसत आहे. व्हिडिओवरून असं कळतंय की, फरहान अख्तरने ‘डॉन-3’ चित्रपटाची घोषणा केली आहे, जो २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डॉन’चा तिसरा भाग आहे.

हे देखील वाचा – Nawazuddin Siddiqui New Movie: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ थिएटरमध्ये नव्हे तर ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे पाहता येणार?

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

एकीकडे या चित्रपटाची घोषणा झाली असताना या चित्रपटात शाहरुख खानऐवजी रणवीर सिंह दिसणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे नेटकरी फरहानवर भडकले असून त्याच्या या पोस्टवर कमेंट्सद्वारे राग व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, “थोडी लाज बाळगा, शाहरुखसोबत हा चित्रपट का केला नाही?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, “नो शाहरुख खान, नो डॉन.” शिवाय आणखीन एका नेटकऱ्याने कमेंट करून म्हटलंय, “शाहरुख शिवाय हा चित्रपट होऊच शकत नाही.”

हे देखील वाचा – …म्हणून ‘जेलर’च्या सेटवर रजनीकांत यांनी मागितली जॅकी श्रॉफची माफी ! खुलासा करत सांगितला ‘हा’ किस्सा

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला डॉन चित्रपटाचा पहिला भाग २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर पाच वर्षांनी २०११ मध्ये याचा दुसरा भाग आला होता. विशेष म्हणजे, हे दोन्ही चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते. आता या चित्रपटाची घोषणा झाल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. (Don 3 Movie Announced)

Tags: bollywood movieDon 3 Movie Announced ?farhan akhtarshahrukh khan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Kranti Redkar Daughters

क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींच्या नावामागची गोष्ट काय?, समीर वानखेडे म्हणाले, "आत्याला कॅन्सर झाला होता अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.