Nawazuddin Siddiqui New Movie: काही कलाकारांची अभिनयाची समज ही कलाकार म्हणून त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन त्यांच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि म्हणूनच त्यांची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरते. (Nawazuddin Siddiqui New Movie)
काळाप्रमाणे त्यांनी कामात देखील बदल केला. त्यांच्या चित्रपटांना जितकं प्रेम मिळत तितकीच त्यांच्या वेबसरीजची देखील चलती आहे.न थांबता नवाजुद्दीन सातत्याने नवनवीन भूमिकांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच त्यांचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर, दुसरीकडे आता त्यांच्या ‘हड्डी’ या चित्रपटाची देखील चर्चा सुरू आहे. या चित्रपटात नवाज एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहेत. आता त्यांच्या ‘हड्डी’ या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
जाणून घ्या कुठे पाहता येणार नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा ‘हड्डी’ हा चित्रपट? (Nawazuddin Siddiqui New Movie)
कोरोनोच्या काळात लॉकडाऊन च्या दरम्यान ओटीटी माध्यमांनी त्यांचं वर्चस्व निर्माण केलं आहे. अनेक चित्रपट सध्या ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होत आहेत.नुकतेच ‘हड्डी’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. मात्र, मेकर्सनी या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. नवाजुद्दीन यांचा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा आगामी चित्रपट ‘झी५’ वर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘हड्डी’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना त्यांनी ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यासाठी खूप उत्सुक आहे. ‘हड्डी’ लवकरच झी५ वर येत आहे.’
हे देखील वाचा: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने गुपचूप उरकलं लग्न? स्वतः केला खुलासा म्हणाली, “मी आधीच….”
या पोस्टवरचा नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी साडी नेसून एका तृतीयपंथी व्यक्तीच्या भूमिकेत खुर्चीवर बसलेले दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी ‘हड्डी’ चित्रपटात एका तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. आतापर्यंत नवाजचे यांचे या चित्रपटातील तीन ते चार लूक समोर आले आहेत. तर, आता चाहत्यांना त्यांच्या नवीन लूकनेही भुरळ घातली आहे. (Haddi New Movie)