शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’ने डच्चू दिला नाहीतर…”, कार्यक्रमातून हाकलून देण्यावरुन बोलणाऱ्या शरद उपाध्येंना निलेश साबळेंचं थेट उत्तर, नेमकं प्रकरण काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2025 | 4:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nilesh Sable On Sharad Upadhye

'चला हवा येऊ द्या'ने डच्चू दिला नाहीतर…", कार्यक्रमातून हाकलून देण्यावरुन बोलणाऱ्या शरद उपाध्येंना निलेश साबळेंचं थेट उत्तर, नेमकं प्रकरण काय?

Nilesh Sable On Sharad Upadhye : सध्या सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम झालं आहे. या सोशल मीडियावर अनेक मंडळी आपलं मत खुलेआमपणे मांडतात. अशातच अभिनेता, दिग्दर्शक निलेश साबळेबाबत सुप्रसिद्ध राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी केलेली खरमरीत पोस्ट लक्षवेधी ठरली. निलेश यांच्यावर थेट आरोप-प्रत्यारोप करत त्यांनी पोस्टद्वारे केलेले पाहायला मिळाले. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात निलेश साबळे दिसणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना त्यांनी निलेश यांना या कार्यक्रमातून हाकलून लावण्यात आल्याचं म्हटलं, शिवाय त्यांना इथून डच्चू दिला आहे असंही शरद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं, यावर आता निलेश यांना थेट व्हिडीओ पोस्ट करत शरद उपाध्ये यांचा हा मुद्दा खोडून काढला आहे.

निलेश यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले, “नमस्कार, मी. डॉ. निलेश साबळे. सन्माननीय राशिचक्रकार शरद उपाध्ये सर यांच्याशी थेट संवाद साधता आला असता, पण काल त्यांना सोशल मीडियातून व्यक्त व्हायचं होतं. म्हणूनच असा माहिती पुरवणारा, सत्य काय हे दाखवणारा व्हिडीओ मला करावा वाटला. तर तुमची आणि माझी एक किंवा दोनदा भेट झाली. काल शरद उपाध्येनि जी पोस्ट लिहिली त्यात, पहिलंच वाक्य होतं की, झी मराठीने मला डच्चू दिला. मी खाली पाहून वाचतोय कारण मी मुद्दे काढून बोलतोय, कारण उगीच कोणत्या ही विषयावर मुद्द्याविना बोलणं मला जमत नाही”.

आणखी वाचा – प्रेक्षकांची लाडकी सून लवकरच छोट्या पडद्यावर, नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

त्यांनी म्हटलं की, “झी मराठीने डच्चू दिला, हकालपट्टी केली असं तुमचं पहिलंच वाक्य होतं, तर सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला याची संपूर्ण माहिती आहे का?, वा बाहेर मीडियाला याबाबत माहिती आहे का?, तर सर्वांना मला महत्त्वाची माहिती द्यायची आहे की, कार्यक्रमाला मी नाही म्हटलं. याबाबतची माहिती तुम्ही करुन घेणं आवश्यक होतं, मला तर लोकं फॅन म्हणून फॉलो करतात पण तुम्हाला गुरु मानतात. सोशल मीडियाचा वापर करतो तेव्हा या गोष्टीची माहिती घेणं ही तुमची जबाबदारी आहे”.

आणखी वाचा – “माहित नाही तरुण राहण्याचा का शॉक आहे”, शेफाली जरीवालाच्या मृत्यूबद्दल पाकिस्तानी अभिनेत्रीच वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “खूप वाईट…”

शेवटी त्यांनी म्हटलं की, “तुम्ही एक कॉल करुन विचारायला हवं होतं की निलेश साबळे झी मराठीमध्ये का नाहीत?. दोन महिन्यांपूर्वी वा सव्वा महिन्यापूर्वी कार्यक्रमाला घेऊन माझी झी मराठीसह मिटिंगही झाली. यादरम्यान माझ्याही काही अडचणी होत्या. माझ्या एका चित्रपटाचं एक शूटिंग सुरु आहे, त्यामुळे तारखा जुळत नव्हत्या, आणि माझी माझी अशीही काही कारण होती त्यामुळे मी स्वतःच या कार्यक्रमातून बाहेर पडलो. भाऊ कदम सरांचंही असंच आहे, ते आणि मी एकत्र एकाच सिनेमात काम करतोय”.

Tags: marathi actornilesh sableSharad Upadhye
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
Nilesh Sable On Sharad Upadhye

"पाणी विचारलं नाही ही माझी जबाबदारी?", निलेश साबळेंचा शरद उपाध्येंना थेट सवाल, म्हणाले, "डोक्यात हवा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.