शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रेक्षकांची लाडकी सून लवकरच छोट्या पडद्यावर, नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tejashri Pradhan New Serial

प्रेक्षकांची लाडकी सून लवकरच छोट्या पडद्यावर, नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर

Tejashri Pradhan New Serial : मराठी मालिकाविश्वात लवकरच एका नव्या मालिकेची एंट्री होणार आहे. आणि या मालिकेत प्रेक्षकांची आणि मालिकाविश्वाची लाडकी सून पदार्पण करणार आहे. बरेच दिवसांपासून या मालिकेची, मालिकेतील कलाकारांची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर आता या मालिकेचा मुहूर्त पार पडला आहे.
झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या या नव्या मालिकेचं नाव ‘वीण दोघांतली ही तुटेना’ असे आहे. ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे देखील झळकणार आहे.

काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो समोर आला. या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान आता या मालिकेबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. तेजश्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात ती मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करत असल्याचं दिसतंय. तसेच ही स्टोरी शेअर करत तिने कॅप्शन लिहिलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सर्वांच्या साक्षीने सुरुवात करते. मायबाप प्रेक्षकहो आपल्यातली ही वीण कायम घट्ट राहू दे”.

आणखी वाचा – २५ वर्षांनंतर नियती राजवाडेचं मालिकाविश्वात कमबॅक, ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकेतून छोटा पडदा गाजवणार

तेजश्रीच्या या पोस्टवरुन तिच्या नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून प्रेक्षक तिला या नव्या मालिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तसेच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी तर, अभिनेता सुबोध भावे समर हे पात्र साकारणार आहे. आपल्या भावा-बहिणीच्या सुखासाठी समर-स्वानंदी या दोघांनी एकमेकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोघांची अनोखी व हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – Video : कलाकार झाले सेवेकरी! वारकऱ्यांच्या सेवेत आदेश बांदेकर दंग, पायांना मसाज केला अन्…

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर काहींनी मालिकेला हिंदी मालिकेची कॉपी असल्याचं म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. थेट कमेंटमध्ये या मालिकेचा नवा प्रोमो पाहून मालिकेला ट्रोल केलं गेलं. असं असलं तरी तेजश्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि तिला छोट्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकवर्ग खूपच उत्सुक आहे.

Tags: marathi serialnew serialtejashri pradhan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Asma Abbas On Shefali Jariwala

"माहित नाही तरुण राहण्याचा का शॉक आहे", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबद्दल पाकिस्तानी अभिनेत्रीच वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "खूप वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.