मराठमोळी संस्कृती जपावी, तीच महत्व संपूर्ण जगाला समजावं भविष्यात येणारी अमराठी पिढीला समजावं या साठी अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. असाच एक प्रयत्न केला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी ‘ प्राजक्ता राज ‘ या नवीन बिझनेसची सुरुवात केली. मराठी मोळ्या संस्कृतीतील अनेक जुने , नवे दागिन्यांचे प्रकार प्राजक्ताच्या या नवीन संकल्पनेत तयार करण्यात आले आहेत.(Prajakta Mali Sachin Goswami)
प्राजक्ताच्या या नवीन संकल्पनेत अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद तिला मिळताना दिसतायत. मराठीतील एका दिग्ग्ज दिगदर्शकाने देखील प्राजक्ताला आशीर्वाद आणि काही नवीन संकल्पना सुद्दा सुचवल्या आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाचे दिगदर्शक, निर्माते आणि पांढऱ्या केसांचा राजपुत्र म्हणून ओळख असणारे सचिन गोस्वामींनी यांनी दिलेल्या शुभेच्छांचा एक व्हिडिओ प्राजक्ताने शेअर केला आहे.

प्राजक्ताराज मध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या दागिन्यांचा एक संच तिने सचिन गोस्वामींना भेट दिला आहे आणि हास्यजत्रेतील सर्व स्त्री कलाकारांना हे दागिने वापरण्यासाठी देऊ असं देखील सांगितलं आहे.हास्यजत्रेमध्ये आमच्या कलाकारांनी मराठी अलंकार वापरावेत म्हणून आमच्या प्रॅाडक्शन हाऊसलाच “प्राजक्तराज” चं ‘सोनसळा’ कलेक्शन भेट दिलं. तेव्हा सरांनी एक कल्पना सुचवली की असा एकत्रित दागिन्यांचा बॅाक्सच का नाही आणत? जेणेकरून लोकांना भेट म्हणून द्यायला; स्वतःलाही वापरायला संपूर्ण सेट राहील आणि त्यातून प्रेरणा घेऊन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही तुमच्यासाठी काहितरी खास आणतोय… यावर सचिन गोस्वामींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत(Prajakta Mali Sachin Goswami).
हे देखील वाचा – Apple चे सीईओ टीम कूक यांना मुंबईच्या वडापावची भुरळ, धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत घेतला वडापावचा आस्वाद..
प्राजक्ता ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत सूत्र संचालन करताना दिसते तर सचिन गोस्वामी या शो चे निर्माते, दिगदर्शक असून हा शो प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना पाहायला मिळतो.