Apple चे सीईओ टीम कूक यांना मुंबईच्या वडापावची भुरळ, धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत घेतला वडापावचा आस्वाद..

Madhuri Dixit Tim Cook
Madhuri Dixit Tim Cook

तुम्ही आम्हीदेखील वडापाव खातोय, त्याचे हुकमी चवीचे ‘हाॅट स्पाॅट ‘ आपल्यालाही सवयीचे झालेत. जिभेला काही गरमागरम खावसं वाटलं की आपण एकाद्या काॅर्नरचा असो, नाक्यावरचा असो, रस्त्यावरचा असो, शिवसेना शाखेबाहेरचा असो, हाॅटेलचा असो आपली पावले आपोआपच तेथे वळतात. पूर्वी सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पिक्चरला गेल्यावर मध्यंतरला वडापाव खाणे ही सवय होती. मल्टीप्लेक्समधला वडापाव मात्र महाग आहे. ते काही असो. (Madhuri Dixit Tim Cook)

वडापाव ही मुंबईची एक ओळख आहे, खाद्य संस्कृतीतील एक हुकमी फंडा आहेच. म्हणून तर Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक हे आयफोन कंपनीच्या भारतातील पहिल्याच स्टोअर्सच्या उदघाटनासाठी मुंबईत आले असताना आपल्या माधुरी दीक्षितने त्यांना वांद्रा कुर्ला संकुलातील बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये त्यांना वडापाव खिलवला याची जणू ब्रेकिंग न्यूज झाली. मिडियात ही बातमी फोटोसह हुकमी ठरलीय. हे श्रेय वडापावचे आणि माधुरीचेही.

पडद्यावर माधुरी ने खाल्ला होता वडापाव

पडद्यावरही माधुरी दीक्षितने बटाटा वडा एन्जाॅय केलाय. मजा अशी की बटाटा वडा महाराष्ट्रीय,पण गीत संगीत नृत्य साऊथ इंडियन असा अजब मामला रंगला. अर्थात, तुम्हालाही माहित्येय पारंपरिक मसालेदार मनोरंजक लोकप्रिय चित्रपटात केव्हाही/ कधीही/काहीही घडू/बिघडू शकते, त्याच अलिखित नियमानुसार हे गीत संगीत व नृत्य झाले म्हणावे. पण म्हणून काय बटाटा वडा गाणे चक्क साऊथ इंडियन पध्दतीचे असावे? ‘हिफाजत ‘ ( १९८७) या चित्रपटात अगदी तस्सेच झाले.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यावरचे बटाटा वडा हे मसालेदार टेस्टी गाणे अगदी तस्सेच आहे. आणि विशेष म्हणजे दक्षिणेकडील तीन चार रुपात ते साकारलयं.

या फोटोतील माधुरी दीक्षितचे साऊथ इंडियन रुपडं त्याच गाण्यातील आहे. आणखीन एक विशेष म्हणजे अनिल कपूर या चित्रपटात रामकुमार आणि राजकुमार अशा दुहेरी भूमिकेत आहे. तर माधुरी दीक्षित जानकी या साऊथ इंडियन युवतीच्या भूमिकेत आहे. आता तिला सिनेमात का असेना पण वडापाव हवासा झाला तेव्हा ती मुंबईकर झाली म्हणायचे. त्या दिवसांत ती मुंबईत अंधेरी पूर्वच्या जे. बी. नगर भागात राह्यची आणि तेथे वडापाव टेस्टी मिळतो असे तीच त्या दिवसांत आपल्या मुलाखतीत सांगायची. एकाद्या गोष्टीला किती कनेटीव्हीटी असते बघा.(Madhuri Dixit Tim Cook)

‘हिफाजत ‘चे निर्माते ए. सूर्यनारायण हे साऊथ इंडियन असल्याने तसे झाले असावे. तर दिग्दर्शक प्रयाग राज हे मनमोहन देसाईंच्या चित्रपटाच्या लेखकांपैकी एक होते. मनजींच्या चित्रपटात काय वाट्टेल ती धमाल चालायची, तशीच ती येथेही चालेल असे वाटले असण्याची दाट शक्यता आहे. आणि हे गाणे लोकप्रिय झाले आणि त्यामुळेच हा चित्रपट माहिती झाल्याने तर या गाण्याचा हेतू साध्य झाला असेच म्हणावे लागेल.

हे गीत मजरुह सुल्तानपुरी यांनी लिहिले असून संगीत राहुल देव बर्मनचे संगीत आहे. आणि आशा भोसले आणि एस. बालसुब्रह्मण्यम यांनी ते गायले आहे. येथेही महाराष्ट्रीय आणि साऊथ इंडियन असे जबरा काॅम्बिनेशन आहे.प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे तर अशा अनेक गोष्टींची सरमिसळ होतच असते. ती वडापावसारखी टेस्टी हवी.. ती एन्जाॅय करायची इतकेच!

हे देखील वाचा – ‘पॅरिसमध्ये असताना अनिकेत वर हल्ला झाला होता आणि…..’अशोक सराफ यांनी सांगितला मुलासोबत घडलेला तो प्रसंग!

वडापावची चटकमटक इतक्यावरच थांबत नाही. काही महिन्यांपूर्वीच शिल्पा शेट्टी जुन्या मुंबई पुणे रोडने मुंबईला येत असतानाच तिला खोपोलीतील फेमस वडापाव सेंटर दिसताच तिने गाडी थांबवून गरमागरम वडापावचा मस्त आस्वाद घेतला. हातोहाती मोबाईल कॅमेरा असल्याच्या आजच्या युगात लगेचच या ‘खाद्य क्षणा’चे शूटिंग झाले आणि ती मुंबईत पोहचेपर्यंत ही चक्क वृत्तवाहिन्यांची बातमीही झाली.

म्हटलं ना, सेलिब्रिटीजच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून न्यूज जन्माला येते ( म्हणून आता अनेक सेलिब्रिटीज कुठे कुठे वडापाव खाण्याची आपली रिल्स सोशल मिडियात पोस्टही करतील. ) जाॅन अब्राहम चित्रपटसृष्टीत नवीन असताना आपण अंधेरीतील जम्बो दर्शन सोसायटीत राहत असताना आपण वडापाव आवर्जून खायचो असे आवर्जून सांगायचा.(Madhuri Dixit Tim Cook)

शिल्पालाही आवरला न्हवता वडापाव खाण्याचा मोह..

(Madhuri Dixit Tim Cook)

तुम्ही राज कपूर दिग्दर्शित सर्वात तरुण चित्रपट ‘बाॅबी’ अनेकदा एन्जाॅय केला असेलच. त्यात राजा ( ॠषि कपूर) जेव्हा मिसेस ब्रिगेन्झा ( दुर्गा खोटे) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेली भेट पाहून त्यांना भेटायला वस्तीत जातो तेव्हा बाॅबी ( डिंपल कापडिया) दरवाजा उघडते तेव्हा ती किचनमधून आलेली असते आणि तिच्या उजव्या हाताला चणा पीठ लागलेले असते, अशातच त्याच हाताने ती बटा जरा बाजूला सरकवते, तेव्हा तिच्या केसांना तिच्या हाताचे चणा पीठ लागते.

( डिंपलची ही मुद्रा मनात फिट्ट बसलीय. या एका दृश्यासाठी ‘बाॅबी ‘ पुन्हा पुन्हा पाहू शकता .) आता चणा पीठ म्हटलं म्हणजे, भजी अथवा बटाटा वडा असू शकतो…..नक्की काय ते राज कपूर जाणे. पण हा सीन भारी आहे. सिनेमा आणि वडापाव हे नाते भन्नाट आहे हो. चला, आपणही वडापाव खावूयात.

लेखक: दिलीप ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sachin PIlgoankar Fake Name
Read More

सचिनने पहिले दिग्दर्शन चक्क टोपणनावाने का बरे केले?

मनोरंजन क्षेत्रात आपल्या मूळ नावातच बदल करणे (रवि कपूरचा जितेंद्र झाला), कोणी नावात शाॅर्टफाॅर्मने आडनाव अगोदर लावणे (शांताराम…
Ashok Saraf Opposition
Read More

अशोक सराफची अशोक सराफशीच स्पर्धा झाली तेव्हा….

आपल्या एकावन्न वर्षांच्या अष्टपैलू कारकीर्दीत ‘बहुरुपी’ अशोक सराफने कळत नकळतपणे अनेक लहान मोठे विक्रम केलेत आणि हेच त्याचे…
Mahesh Kothare Sachin Pilgoankar
Read More

कोठारे-पिळगावकर कुटुंबा बाबत अनोखा योगा योग!वडिलांनी चित्रपट सृष्टीत आणलं आणि पाहिल्याचं चित्रपटात मिळवले पुरस्कार

सध्या हुकमी हवा कोणाची आहे? राजकारणातील उलटसुलट हवा म्हणत नाही हो की उन्हाळ्यात अधूनमधून चक्क वीजांचा कडकडाट होत…
Bollywood Actors in Marathi
Read More

हिंदीवाल्यांचे मराठीत पाऊल भारी कौतुकाचे

रोहित शेट्टीचा ‘स्कूल काॅलेज आणि लाईफ’ ( त्याची बायको महाराष्ट्रीय असल्याने त्याने मराठी चित्रपटाची निर्मिती करुन ‘घरची मर्जी…