शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते”, ‘नाच गं घुमा’चा भन्नाट टीझर प्रदर्शित, छोट्या मायरासह नम्रता संभेराव व मुक्ता बर्वेचा लक्षवेधी अंदाज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 3, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Naach Ga Ghuma Teaser

"प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते", 'नाच गं घुमा'चा भन्नाट टीझर प्रदर्शित, छोट्या मायरासह नम्रता संभेराव व मुक्ता बर्वेचा लक्षवेधी अंदाज

आशयघन चित्रपट आणि परेश मोकाशी हे एक समीकरण झालं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. वाळवी या चित्रपटानंतर परेश मोकाशी यांची एक नवी कलाकृती आपल्या भेटीस येणार आहे. ही कलाकृती म्हणजे सध्या चर्चा असलेला ‘नाच गं घुमा’. येत्या १ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. चित्रपटाच्या मोशन पोस्टरने ही उत्सुकता द्विगुणित केली. (Naach Ga Ghuma Teaser)

अशातच आता या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते”, या डायलॉगने टीझरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या प्रत्येक महिलेला घरकामात हात लावण्यासाठी आणखी दोन हातांची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता पूर्ण करणारी स्त्री म्हणजे घरकाम करणारी कामवाली बाई. आजकाल ऑफिसला जाणाऱ्या, वा एखाद्या व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला कामवाली बाईची आवश्यकता असते. आणि एखाद दिवशी ही बाई कामावर आली नाही तर काय घडू शकतं याचं हुबेहूब वर्णन या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – डोहाळ जेवणातील कार्यक्रमात कार्तिकी गायकवाडच्या ब्लाऊजचीच रंगली चर्चा, बाळाच्या आकाराचं डिझाइन अन्…; पाहा फोटो व व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

टीझरमध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तर भाडीपाचा फाउंडर सारंग साठे याची देखील भूमिका पाहायला मिळत आहे. तर छोट्या मायरा वायकुळच्या अभिनयाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, बालकलाकार मायरा वायकुळ या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरतंय.

आणखी वाचा – “कुत्र्यालाच कालवणात टाकशील”, कुत्र्याला घेऊन जेवण करणाऱ्या प्रार्थना बेहरेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “घाणेरडी त्याचे केस हाताला असताना…”

टिझरने ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केलं आहे. तर लेखक म्हणून परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णी या दोघांनी जबाबदारी सांभाळली आहे. जर एखादी स्त्री तिच्या घरची ‘राणी’ असेल, तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी ‘परीराणी’च्या रुपात समोर येते असं या चित्रपटाचं आगळंवेगळं कथानक आहे.

Tags: marathi moviemukta barve and namrata sambheraoNaach Ga Ghuma Teaserparesh mokashi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Taiwan earthquake latest news buildings collapse roads destroyed see the details

Video : तैवानमध्ये जीवघेणा भूकंप, इमारती कोसळल्या, रस्तेही उरले नाहीत अन्…; त्सुनामीचाही इशारा, हृदय पिळवटून टाकणारी दृश्य समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.