शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : तैवानमध्ये जीवघेणा भूकंप, इमारती कोसळल्या, रस्तेही उरले नाहीत अन्…; त्सुनामीचाही इशारा, हृदय पिळवटून टाकणारी दृश्य समोर

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 3, 2024 | 2:13 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Taiwan earthquake latest news buildings collapse roads destroyed see the details

Video : तैवानमध्ये जीवघेणा भूकंप, इमारती कोसळल्या, रस्तेही उरले नाहीत अन्...; त्सुनामीचाही इशारा, हृदय पिळवटून टाकणारी दृश्य समोर

तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (३ एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी मोजली गेली असून या तीव्रतेचा भूकंप हा धोकादायक श्रेणीत मोडतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तैपेईच्या अनेक भागांत वीज गेली आहे. भूकंपामुळे अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यांना भेगा पडल्या. हाअ भूकंप तैवानमधील गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे म्हटले जात आहे. भूकंपानंतर लगेचच शेजारील देश जपान सतर्क झाला आणि त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लोकांना सखल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यासही सांगण्यात आलं आहे.

भूकंपाची तीव्रता लक्षात घेता जपान आणि इतर शेजारील देशांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तैवान हा एक असा देश आहे जिथे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. याचे कारण या देशाची भौगोलिक स्थिती आणि रचना आहे. दरम्यान, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे कोणीतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची बातमी अद्याप मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत. ‘व्हॉल्कॅनो डिस्कवरी’च्या अहवालानुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची खोली ३५ किमी होती आणि देशाच्या मोठ्या भागात हा भूकंपचा धक्का जाणवला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Video : ‘गुलाबी साडी’वर डान्स करत असताना बायकोवर भडकला प्रसाद ओक, हातात गुलाबी रंगाची बॅग घेऊन आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

तैवानचा शेजारी देश जपाननेही भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीने ३ मीटर (१० फूट) उंचीपर्यंत त्सुनामीच्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ‘नवभारत’च्या वृत्तानुसार, तैवानच्या पूर्व भागात जोरदार भूकंप झाल्यानंतर, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की भूकंपाची तीव्रता ७.४ होती आणि त्याचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून १८ किलोमीटरवर होता. तैवानमधील या भूकंपाचा प्रभाव जपानमध्येही दिसून आला.

आणखी वाचा – “दिव्यांग मुलाच्या आईने मला जोरात हाक मारली अन्…”, प्रशांत दामलेंनी सांगितलं नाट्यगृहात काय घडलं?, म्हणाले, “मी निघत असताना…”

तैवानमधील आजच्या या भूकंपामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिकजण जखमी झाल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे. दरम्यान, सप्टेंबर १९९९ मध्ये ७.६ तीव्रतेच्या भूकंपात तब्बल २ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१८ मध्ये, हुआलियन शहरात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्यामध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० लोक जखमी झाले होते.

Tags: Taiwan Earthquake Marathi NewsTaiwan Earthquake News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Randeep Hudda on kangana ranaut

"आलिया व माझं धार्मिक कनेक्शन आणि…", कंगना रणौतला सुनावत रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "विनाकारण तिला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.