मराठी नाटक, मालिका, चित्रपट व ओटीटी माध्यमाद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय वाघने त्याच्या सशक्त अभिनयानं आणि प्रभावी सादरीकरणानं मराठीसह इतर भाषिक मनोरंजनसृष्टीतही आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अमेय वाघ सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
अमेयच्या या फोटो व व्हिडीओवर चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच अमेयने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो भजनात दंग झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच महाशिवरात्रीचा सण साजरा झाला. अवघ्या देशभरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तीमय वातावरण होते. याच शिवरात्रीनिमित्त अमेयने त्याच्या गावी भेट दिली होती. यावेळी त्याने पालखी सोहळ्यातदेखील सहभाग घेतला होता.
अमेयने स्वत:च्या खांद्यावर पालखी घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. अशातच त्याचा हा भजनामध्ये दंग झाल्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. “पूरे झाली शहरातल्या मित्रांबरोबर चंगळ. मला सामावून घेत आहे गावातलं भजनी मंडळ” असं म्हणत अमेयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमेय ‘हे भोळ्या शंकरा’ हे पारंपरिक भजन गात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी त्याने टाळ वाजवत या भजनावर चांगलाच ठेका धरला असल्याचेही पाहायला मिळत आहे.
दरम्यान अमेयने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “किती छान, मस्तचं, खूपच भारी, हल्ली याची खूपच गरज आहे” अशा अनेक कमेंट्स करत अमेयचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी त्यांना हे भजन आवडले असल्याचेदेखील म्हटले आहे.