मैत्रीची व्याख्या ही प्रत्येकानुसार निरनिराळी असते. एक मित्र म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एका तर व्यक्तीला स्थान असतंच. मैत्री म्हणजे कोणासाठी प्रेम, तर कोणासाठी आधार देणारी यारी असते. तर कोणासाठी दुनियादारी. मात्र ही यारी मर्यादेपलीकडे जाते तेव्हा ‘दिल दोस्ती दिवानगी’ यातील रेषा पुसट होत जातात. मैत्री व प्रेमातील हीच ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट रूपाने ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्ट’ची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा साकारली आहे. (Dil Dosti Deewangi New Movie)
नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या चित्रपटात अभिनेता कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या कलाकारांना पाहणं रंजक ठरणार आहे. या सोबत अभिनेते प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी व मात्तब्बर कलाकारांना ही चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी यांनी केलं असून चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी अमोल खानविलकर यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. तर सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहेत.
छोटा पडदा गाजवणारे हे कलाकार आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाले आहेत. मैत्रीची या चित्रपटाची नेमकी व्याख्या काय असणार आहे हे पाहणं चित्रपटात रंजक ठरेल.