शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हिरवागार निसर्ग, आंब्याची झाडं अन्…; नाशिकमध्ये जागा विकत घेऊन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बांधलं स्वतःचं घर, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2023 | 6:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Varsha Dandle New Farmhouse

Video : हिरवागार निसर्ग, आंब्याची झाडं अन्…; नाशिकमध्ये जागा विकत घेऊन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बांधलं स्वतःचं घर, व्हिडीओ व्हायरल

बरेच असे कलाकार आहेत जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी त्या नेहमीच सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर करत असतात. कित्येकदा या कलाकार मंडळींच्या घराबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. प्रेक्षकांनाही कलाकारांच्या घराबद्दल जाणून घ्यायला आवडते. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आजवर त्यांच्या गावाबाहेर जमीन म्हणा वा फार्महाऊस घेऊन स्वप्न पूर्ण केली आहेत. (Varsha Dandle New Farmhouse)

याचं ताज उदाहरण द्यायचं म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेलं कर्जत येथील फार्महाऊस. ‘प्राजक्तकुंज’ असं नाव देत प्राजक्ताने निसर्गाच्या कुशीत फार्महाऊस घेतलं आहे. प्राजक्ताच्या या फार्महाऊसच बरंच कौतुकही झालं. नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ची टीम प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या फार्महाऊसला पोहोचली होती. आता प्राजक्ता पाठोपाठ आणखी एका सिनेसृष्टीतील कलाकाराचं तीच फार्महाऊसच स्वप्न पूर्ण झालं आहे.

मालिकाविश्वात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी त्यांच्या स्वप्नातलं फार्महाऊस खरेदी केले आहे. अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी नाशिकमध्ये फार्म हाऊस बांधल्याच सांगत त्याची झलक सोशल मीडियावरून शेअर केली आहे. आजवर वर्षा दांदळे यांनी छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या नेहमीच त्यांच्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींचे अनेक व्हिडीओ करून सोशल मीडियावरून शेअर करत असतात. सोशल मीडियावर वर्षा दांदळे यांचा उत्तम वावर असतो. अशातच त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – अचानक केईएम रुग्णालयामध्ये पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रसिद्ध मराठी अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “काम करणारे…”

View this post on Instagram

A post shared by Varsha Dandale (@varshadandale)

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अपूर्वा नेमळेकर हिंदीमधील खलनायिका साकारणार, प्रोमो पाहताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “भूमिकेसाठी वाईट…”

या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या नाशिकजवळ बांधलेल्या फार्म हाऊसची झलक दाखवली. व्हिडीओ शेअर करत त्या म्हणाल्या की, “मी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी या गावी आले आहे. तिथे आम्ही दहा गुंठे जागा विकत घेतली आहे आणि आमचं छोटसं घर बांधलं आहे. मी व माझे मिस्टर अधून मधून इथे येत असतो. इथे आम्ही आंब्याची झाडंही लावली आहेत. ती अजून छोटी आहेत. मजा येते अशा निसर्गरम्य वातावरणात राहायला. हे स्वप्न होतं माझं ते आता देवाच्या दयेने पूर्ण झालं आहे.”

Tags: entertainmentnava gadi nav rajyaprajakta malivarsha dandle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Amruta Khanvilkar Amarnath Yatra Video

Video : देवदर्शन करतेय अमृता खानविलकर, अमरनाथ यात्राही केली पूर्ण, यात्रेविषयी म्हणाली, “मुक्या प्राण्यांना त्रास…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.