Divya seth shah daughter passed away : मनोरंजन क्षेत्रातून सध्या अनेक दुखद बातम्या समोर येत आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री दिव्या सेठ शाहच्या मुलीचे निधन झाले आहे. कमी वयात मिहीकाचे निधन झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मुलीचे निधन झाल्याची माहिती स्वतः दिव्या यांनी दिली आह. ५ ऑगस्ट २०२४ रोजी तिला खूप ताप आला आणि त्यातच तिला अटॅक आल्याने तिचे निधन झाले. तिचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला आहे. ८ ऑगस्ट रोजी मृत्यू पश्चात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
दिव्या यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिहीकाची ८ तारखेला शोकसभा आयोजित करण्यात आल्याचे लिहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या यांची मुलगी दीर्घ काळापासून आजारी होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिव्या यांनी मुलीबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये लिहिले होते की, “डीएनए हे एक मिथ्य आहे. बाकी सर्व काही मेहनतीने मिळवता येतं. मातृत्वाबद्दल आभार”. मिहीका ही आईप्रमाणे अभिनेत्री नव्हती. तिने फोटोग्राफीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. तिने ५ मे रोजी आईबरोबर शेवटचा फोटो शेअर केला होता. यामध्ये ती आजीबरोबर आपला वेळ घालवताना दिसत आली होती.
दिव्या यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्या टेलिव्हिजनमधील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. तसेच चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘दिल धडकने दो’, ‘आर्टिकल ३७०’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘द मॅरीड मॅन’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ व ‘दुरंगा’ अशा वेबसिरिजमध्येही दिसून आल्या आहेत.
त्यांच्या प्रमाणेच दिव्या यांची आईदेखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर ‘सिलसीला’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘कभी खुशी कभी गम’ व ‘कल हो ना हो’ अशा मोठ्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. तसेच आजवर अक्षय कुमार, ऋषि कपूर, शाहरुख खान, ऋतिक रोशन, अनिल कपूर व प्रीती झिंटा या कलाकारांच्या आई, आजी अशा भूमिकाही साकारल्या आहेत.