महाराजांच्या पराक्रमावर अनेक चित्रपट, मालिका,नाटकं आता पर्यंत निर्माण करण्यात आली आहेत. शिवाय परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास केला जातो. छत्रपती हा एक शब्द हि किती प्रेररणादायी असू शकतो या या बाबत इतर देशांनी संशोधन केले आहे.(Digpal Lanjekar IIT Madras)
महाराजांची महतीचा महिमा आता लवकरच मद्रास येथील IIT संस्थेत देखील घुमणार आहे. लेखक,दिगदर्शक, इतिहास प्रेमी दिग्पाल लांजेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे . छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या वीर मावळ्यांनावर आधारित शिवराय अष्टक या चित्रपटांच्या मालिकेची जबाबदारी दिगपाल यांनी हाती घेतली आहे.
या मालिकेतील चित्रपट कोणते? ते कसे बनवले गेले ? काय अडचणी येतात? या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मद्रास येथील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून हे व्याख्यान आयोजले असल्याची माहिती दिगपाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे.महाराजांचा पराक्रमी इतिहास असाच अटकेपार पुन्हा पुन्हा पोहचत राहावा हि प्रत्येक शिवशंभूप्रेमींची इच्छा असेल एवढं नक्की.(Digpal Lanjekar IIT Madras)
दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या शिवराय अष्टकातील फर्जंद, फतेहशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चार कलाकृती आता पर्यंत प्रदर्शित झाल्याअसून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या चित्रपटांना मिळालं आहे. तर लवकरच सुभेदार हे शिवराय अष्टकातील पुढचं पुष्प घेऊन दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.