सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यासाठी देओल कुटुंब पोहोचलं रुग्णालयात, पण अभिनेत्याची पहिली पत्नी आहे कुठे?, चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 11, 2025 | 5:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dharmendra Health Update

धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यासाठी देओल कुटुंब पोहोचलं रुग्णालयात, पण अभिनेत्याची पहिली पत्नी आहे कुठे?, चर्चांना उधाण

Dharmendra Health Update : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या रुग्णालयात आहेत. अनेक दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. १० नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली होती, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची रुग्णालयात ये-जा सुरु असल्याचं पाहायला मिळालं. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कठीण काळात, संपूर्ण देओल कुटुंब या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत रुग्णालयात उपस्थित आहे. मात्र धर्मेंद्र यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी प्रकाश कौर आतापर्यंत रुग्णालयात पोहोचू शकल्या नाहीत.

धर्मेंद्र यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल, नातू करण देओल आणि राजवीर देओल त्यांना भेटण्यासाठी अनेकदा हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. अभिनेत्याची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी ईशा देओल यांनीही अनेकदा त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मात्र धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर त्यांना एकदाही भेटायला आली नाही, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण आता त्याचे खरे कारण समोर आले आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर हेमा मालिनी नाहीतर पहिल्या पत्नीसह राहत होते धर्मेंद्र, घटस्फोटही घेतला नाही; ‘सेकंड वुमन’चा टॅगही मिळाला पण…

खरे तर प्रकाश कौर यांचीही प्रकृती ठीक नाही. एबीपी न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर सध्या मुंबईत आहे. ती तिचा मोठा मुलगा सनी देओलसोबत राहत आहे. त्यांची प्रकृतीही ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. गुडघेदुखी आणि चालण्यास त्रास होत असल्याने ती धर्मेंद्रला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचू शकली नाही.

आणखी वाचा – धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खोटं, लेक इशा देओल आणि पत्नी हेमा मालिनीने दिली माहिती, वाचा सविस्तर

देओल कुटुंबाव्यतिरिक्त अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही ब्रीच कँडी हॉस्पिटलला भेट देऊन धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा आणि अमिषा पटेलही ज्येष्ठ अभिनेत्याला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. अभिनेता आणि चित्रपट निर्माते अकबर खान आणि निखिल द्विवेदी धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. एवढेच नाही तर धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दीही जमली आहे.

Tags: bollywood newsdharmendraDharmendra Health Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
dharmendra discharged from hospital

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरी पोहोचताच कुटुंबीयांनी केली पोस्ट, म्हणाले, "त्यांच्यावर आता घरीच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.