सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरी पोहोचताच कुटुंबीयांनी केली पोस्ट, म्हणाले, “त्यांच्यावर आता घरीच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 12, 2025 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
dharmendra discharged from hospital

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरी पोहोचताच कुटुंबीयांनी केली पोस्ट, म्हणाले, "त्यांच्यावर आता घरीच…"

dharmendra discharged from hospital : बॉलिवूडचा ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबरला सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बॉबी देओल सकाळी ७ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचला आणि त्याने वडील धर्मेंद्र यांना रुग्णवाहिकेतून घरी आणले. आता कुटुंबाने ८९ वर्षीय धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची माहिती देणारे निवेदन जारी केले असून सर्वांना गोपनीयतेचे आवाहन केले आहे. धर्मेंद्रवर आता घरीच उपचार होणार असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. यापूर्वी ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले होते की, गेल्या काही आठवड्यांपासून अभिनेत्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात होते तर कधी डिस्चार्ज दिला जात होता. त्याच्या कुटुंबीयांनी आता अभिनेत्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बॉबी देओल वडिलांसोबत घरी पोहोचला आणि कुटुंबाने पुन्हा एक निवेदन जारी केले.

निवेदनात म्हटले आहे की, “धर्मेंद्र जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर घरीच उपचार केले जातील. त्यांची रिकव्हरी घरीच होईल. आम्ही प्रसारमाध्यमांना आणि सर्वसामान्यांना विनंती करतो की, त्यांनी यापुढे कोणतीही अफवा पसरवू नये. यावेळी, धर्मेंद्र जी आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. ते लवकरात लवकर बरे व्हावे, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी आपण सर्वांचे प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. कृपया त्यांचा आदर करा कारण त्यांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे”.

आणखी वाचा – धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यासाठी देओल कुटुंब पोहोचलं रुग्णालयात, पण अभिनेत्याची पहिली पत्नी आहे कुठे?, चर्चांना उधाण

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

धर्मेंद्र यांना १० नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली होते आणि आवश्यक चाचण्या केल्या जात होत्या. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी आली, त्यानंतर धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांच्या टीमने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आरोग्य अपडेट दिले होते. उपचारांचा त्याच्यावर परिणाम होत आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर हेमा मालिनी नाहीतर पहिल्या पत्नीसह राहत होते धर्मेंद्र, घटस्फोटही घेतला नाही; ‘सेकंड वुमन’चा टॅगही मिळाला पण…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

धर्मेंद्रला भेटण्यासाठी शाहरुख-सलमान, आमिर आणि गोविंदा हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. धर्मेंद्र यांची ढासळलेली प्रकृती पाहून सगळेच घाबरले. कुटुंबाव्यतिरिक्त सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान आणि गोविंदा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्रला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. सनी देओल आणि बॉबी देओल सतत हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. वडिलांची अवस्था पाहून तो किती रडला होता हे त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांतून दिसत होते. हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओलही हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत होत्या. दुसरीकडे, धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नातील दोन मुली – अजिता आणि विजेता यांनाही बोलावण्यात आले होते. धर्मेंद्र गेल्या काही आठवड्यांपासून अस्वस्थ होते. ३१ ऑक्टोबर रोजी अभिनेत्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तथापि, अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले होते की धर्मेंद्र ठीक आहे आणि ते फक्त नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल आहेत.

Tags: dharmendraDharmendra Health Updateentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
who is girija oak

महाराष्ट्राची लाडकी लेक बनली नॅशनल क्रश, निळ्या साडीतील 'त्या' फोटोची चर्चा, कोण आहे ती?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.