शाहिद कपूर व क्रिती सेनन यांचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ अखेर आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियापासून ते समीक्षकांपर्यंत या चित्रपटाला चांगले रिव्ह्यू दिले जात आहेत. या चित्रपटात शाहिद व क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कलाकार धर्मेंद्र देखील झळकणार आहेत. पण या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांचे दुसरेच नाव देण्यात आले आहे. (Dharmendra New Name)
बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर तब्बल ६४ वर्षांनी धर्मेंद्र यांनी आपले नाव बदलले आहे. धर्मेंद्र यांनी आपले नाव बदलले असून त्यांच्या या नव्या नावाचा चित्रपटात उल्लेख करण्यात आला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, शाहिद कपूर व क्रिती सेनॉन यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात धर्मेंद्र देओलच्या नावावर धर्मेंद्रला श्रेय देण्यात आले आहे. धर्मेंद्र यांचे बालपणीचे नाव धरम सिंह देओल होते. मात्र, आजपर्यंत स्वतः धर्मेंद्र यांनी याची घोषणा कुठेही केलेली नाही आणि त्यांनी कुठेही त्यांचं नाव बदललेले नाही.
या चित्रपटापूर्वी धर्मेंद्र यांनी नावाआधी किंवा नावापुढे कोणतेही आडनाव वापरले नव्हते. ‘तेरी बात में ऐसा उल्झा जिया’मध्ये धर्मेंद्र शाहिद कपूरच्या आजोबांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात त्यांची छोटी मात्र महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात शाहिद कपूर व क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. क्रिती या चित्रपटात रोबोटच्या भूमिकेत आहे, तर शाहिद हा एक सामान्य माणूस असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि तो क्रितीच्या प्रेमात पडतो. या दोघांच्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील गाणीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
धर्मेंद्रच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हा त्यांचा सलग दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटापूर्वी ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसले होते. या चित्रपटात धर्मेंद्रने रणवीर सिंगच्या आजोबांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी किसिंग सीन दिला होता. शबाना आझमीसह त्यांनी लिप-लॉक केलं होतं ज्याची खूप चर्चा झाली होती.