रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझा राग ग्राउंडवर काढ”, धनश्री वर्माने युजवेंद्र चहलला दिलेला सल्ला, बाथरूममध्ये जाऊन रडला होता क्रिकेटर, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 7, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dhanashree Verma-Yuzvendra Chahal

"तुझा राग ग्राउंडवर काढ", धनश्री वर्माने युजवेंद्र चहलला दिलेला सल्ला, बाथरूममध्ये जाऊन रडला होता क्रिकेटर

Dhanashree Verma-Yuzvendra Chahal : कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या लग्नात फूट पडल्याच्या अफवा असून या दोघांचा घटस्फोट होऊ शकतो, अशा चर्चा सर्वत्र पसरल्या आहेत. या अफवा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. परंतु, युजवेंद्र चहलने अलीकडेच त्याची पत्नी धनश्रीबरोबरचे सर्व फोटो आणि व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हटवल्यानंतर या चर्चांना अधिक गती मिळाली. यानंतर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले असल्याचंही समोर आलं. अशातच आता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये युजी त्यांच्या तुटलेल्या हृदयाबद्दल तसेच त्याच्या रागाबद्दल बोलताना दिसत आहे.

वास्तविक, युजवेंद्र चहल त्याची पत्नी धनश्रीसह रणवीर अल्लाबदिया उर्फ ​​बेअरबायसेप्सच्या पॉडकास्टवर दिसला होता. यादरम्यान रणवीरने युजवेंद्रला विचारले होते की, तुला राग का येतो? या प्रश्नाला उत्तर देताना युजवेंद्र म्हणतो की, “जेव्हा पाणी डोक्यावरुन जाते, तेव्हा माझ्यासमोर कोण आहे याची मला पर्वा नसते”. यानंतर रणवीर युजवेंद्रला विचारतो की, “तुझी मानसिक स्थिती कशी आहे, तू लपवत असलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्या पाहिल्या आहेत का?”. यावर युजीने उत्तर दिले की, “२०२१ च्या दुबई विश्वचषकात माझी निवड झाली नव्हती तेव्हा माझ्याबरोबर असे घडले. त्या वेळी मला सर्वात वाईट वाटले”.

आणखी वाचा – युजवेंद्र चहल व धनश्री वर्माच्या घटस्फोटाला ‘ती’ जबाबदार?, क्रिकेटरसह मिस्ट्री गर्ल हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली अन्…

पुढे तो म्हणाला, “मी आतून खूप तुटलो होतो. त्यावेळी धनश्री माझ्याबरोबर दुबईत होती. आणि तिने माझा राग हाताळण्यात मला खूप मदत केली. धनश्री माझ्याबरोबर नसती तर मी आणखीनच निराश झालो असतो. तिने मला खूप समजून घेतले आणि मला समजावून सांगितले की, फक्त स्वतःला सिद्ध कर. ती मला असंही म्हणाली की, तुला राग काढायचा असेल तर ग्राउंडवर काढ. तेव्हा मला समजले की ती बरोबर होती. त्यानंतर मी माझा पूर्ण राग मैदानावर दाखवला”.

आणखी वाचा – रस्त्यांची परिस्थिती पाहून ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाले, “वर्षानुवर्षे…”

यादरम्यान युजवेंद्र म्हणाला की, तो सहज रडत नाही. जर तो रडला तर याचा अर्थ त्याला खूप वाईट वाटले आहे असा होतो. यावर रणवीर त्याला विचारतो की, “तू रडला आहेस का?”. यावर युजी सांगतो की, ‘तो बाथरूममध्ये जाऊन रडला आहे. हृदय खूप रडतं पण डोळे नकार देतात. परिस्थिती अशी असते की आपसूक वाईट वाटतं. कित्येकदा आपलं मनही रडतं पण डोळे साथ देत नाहीत”. लॉकडाऊन दरम्यान युजीने धनश्रीशी डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. आता त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवेमुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Tags: bollywood newsDhanashree Verma Yuzvendra Chahal divorce rumoursDhanashree Verma-Yuzvendra Chahal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
itsamajja Dahavi-A web series first episode audience responded with millions of views, likes and comments.

'दहावी-अ'च्या पहिल्या एपिसोडला काही तासांमध्येच लाखो व्ह्यूज, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.