‘बिग बॉस ओटीटी ३’ सध्या बरंच चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहे. या शोमधील सर्वच स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच अरमान मलिक व त्याच्या दोन पत्नी कायम चर्चेत राहिल्या. मात्र अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीला हा शो सोडावा लागला. पायल मलिकने ‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून बाहेर आल्यानंतर देवोलीनाच्या बहुपत्नीत्वावरील पोस्टला सडेतोड उत्तर दिले होते. ज्यानंतर आता देवोलिना भट्टाचार्जी हिनेही यावर प्रत्युत्तर दिले आहे. पायलने दुस-या धर्मात लग्न केल्यामुळे अभिनेत्रीवर झालेल्या टीकेचा उल्लेख केला होता. त्याचवेळी, अभिनेत्रीने तिचा नवरा एकनिष्ठ असल्याचे म्हटले आहे. तो बहुपत्नीत्वाचे समर्थन करत नाही असेही म्हटले. देवोलीनाने अरमान मलिकच्या लग्नावर टीका केली होती. अलीकडेच पायल घराबाहेर आल्यानंतर तिला देवोलीनाच्या विचारांवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यानंतर तिने देवोलीनाला त्यांच्या नात्यावर भाष्य करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. (Devoleena Bhattacharjee On Payal Malik)
यानंतर आता देवोलीनाने पुन्हा एक लांबलचक पोस्ट टाकली असून पायलला उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले, “एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या धर्मातील विवाह व बहुपत्नीत्वाची तुलना करण्यासाठी उच्च पातळीचे ज्ञान आवश्यक आहे. मला खात्री आहे की बुद्धिमान लोक बरेच जागरुक आहेत. आणि बहुपत्नीत्वासारख्या बेकायदेशीर कृतीच्या विरोधात उभे राहणे हा फक्त माझा अधिकार नाही तर प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. जो राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर दाखवण्यात त्यांना खूप अभिमान वाटतो. रात्रंदिवस त्रास सहन करणाऱ्या आणि रोज थोड्या थोड्या मरणाऱ्या त्या गरीब स्त्रियांच्या जीवनाची चेष्टा करु नका”.

देवोलीनाने पुढे लिहिले की, “तुम्हाला जे हवे ते करा. दोनवर का थांबायचे? दोन, चार किंवा पाच विवाह करा. हा आजार समाजात पसरवू नका. मी सांगितलेला प्रत्येक शब्द अभिप्रेत आहे आणि मी अजूनही त्यावर ठाम आहे. आणि तरीही, लोक माझ्यावर YouTube कंटेंट बनवत आहेत ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. कृपया आदर करा. माझा नवरा मुस्लीम असूनही तो आपल्या पत्नीशी खूप निष्ठावान आहे, त्याला बहुपत्नीत्वात अजिबात रस नाही आणि हे समजायला आम्हाला चार वर्षे लागली आणि मग आम्ही लग्न केले. फक्त सात दिवसात नाही”.
देवोलीनाने पुढे लिहिले की, “स्त्रीच्या स्वाभिमानाशी तडजोड केली जाऊ नये. पण तुझ्या भावना मी समजू शकते. मला माहित आहे तुला ते समजू शकत नाही. प्रामाणिकपणे मला तुमच्याबद्दल वाईट वाटते. पण मग मला वाटतं हे बघून तुला तुझं लग्न असंच व्हावं असं वाटत होतं”, असं म्हणत पायलला उत्तर दिलं आहे.