शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘सारेगमप’च्या सेटवर मृण्मयी-गौतमीमध्ये वाद, भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 13, 2023 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Deshpande sister’s fight new video viral

Deshpande sister’s fight new video viral

मराठी सिनेसृष्टीतील ज्या दोन बहिणींची सतत चर्चा होत असते त्या म्हणजे देशपांडे सिस्टर्स. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व अभिनेत्री गौतमी देशपांडे या दोघी बहीणी नेहमी चर्चेत असतात. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जरी जागा मिळवली असली तरीही त्यांचं गोड दिसणं व लाघवी हसणं यामुळे त्या प्रेक्षकांना आणखीनच भूरळ पाडतात. त्या दोघी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे या दोघांची भांडणं. (Deshpande sister’s fight new video viral)

या दोघा बहिणींमधील भांडणं व त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. सध्या मृण्मयी ‘सारेगमप’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात विविध पाहुणे मंडळी येत असतात. नुकतीच या कार्यक्रमात पाहुणी म्हणून गौतमी देशपांडेनेही हजेरी लावली होती. त्यावेळी मृण्मयी व तिच्यातील संवादाचा व्हिडीओ गायक सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती दोघेही कोणत्यातरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

आणखी वाचा – मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, लग्न करुन परदेशात गेली अन्…

त्यांच्यातील हे संभाषण बरंच महत्त्वाचं असलेलं दिसत आहे. विषयात ती दोघं इतकी गुंग आहेत की त्यांना आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टीचं भान राहिलेलं नाही. हा व्हिडीओ शेअर करत व्हिडिओच्या कॅप्शन मधून सलीलने संवादाचा विषय स्पष्ट केला आहे. तो विषय म्हणजे चष्मा. कोणी कोणाचा चष्मा घेतला या विषयावरून त्यांच्यात संवाद सुरू आहे. या संवादाचा निकाल शेवटी  काय लागला कळलच नाही. शूटला सुरुवात झाल्यामुळे त्याचं हे भांडण मध्येच थांबवावं लागलं.

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

आणखी वाचा – वडील महेश भट्ट यांच्याबरोबर लिपलॉक करण्यावरून पहिल्यांदाच बोलली पूजा भट्ट, म्हणाली, “असं पुढेही…”

या व्हिडिओवर बऱ्याच नेटकऱ्यांनी लाईक व कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्यांने कमेंटमध्ये लिहीलं, ‘भावंड कधीच शांत संवाद करुच शकत नाहीत’ तर दुसऱ्याने नेटकऱ्याने ‘भांडू नका’ असं कमेंट करत त्यांना न भांडण्याचा सल्ला दिला आहे. एकाने त्यांच्या भांडणाला ‘बाबा रे केवढं ते मोठं गोड भांडण’ म्हणत त्यांच्या भांडणाचं कौतुक केलं आहे.  

Tags: Deshpande sister’s fightnew videoshare by salil Kulkarnisocial mediavideo viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shilpa Shetty Revels Truth

"मोठ्या बॅनरचे चित्रपट मला का मिळत नाही?", शिल्पा शेट्टीने बोलून दाखवली खंत, म्हणाली, "माझे चित्रपट चालले नाहीत पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.