बॉलीवुड आणि हॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नेहमीच चर्चेत असते. स्मित हास्य व नम्र स्वभाव यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. दीपिकाची एक झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी तिच्यामागे असतात, त्याला ती तितकाच प्रतिसादही देते. मात्र आता दीपिकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ज्यात ती पापाराझींवर नाराज झालेली पाहायला मिळत आहे. (Deepika Padukone Video)
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. जेव्हा तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या ब्रायडल फॅशन शोमध्ये तिच्या सासूसोबत हजेरी लावली होती. या शोमध्ये तिचा पती रणवीर सिंगने आलिया भट्टसोबत रॅम्पवॉक केला होता, ज्याची जोरदार चर्चा झाली होती. शोनंतर दीपिका तिच्या सासूसोबत बॅकस्टेजला उभे राहिले असताना अचानक काही पापाराझीं दीपिकाची झलक घेण्यासाठी पुढे आले. तेव्हा दीपिकाने त्या पापाराझींना तात्काळ थांबवत फोटो न घेण्यास सांगितले. “हे बॅकस्टेज आहे, इथे फोटो घेण्यास अलाऊड नाही!”, असं दीपिका पादुकोणने पापाराझींना स्पष्टपणे सांगितले.
हे देखील वाचा – “बाळासाहेब व दिघेसाहेब…” निर्माते मंगेश देसाईंनी ‘धर्मवीर २’ बाबत दिले स्पष्टीकरण, म्हणाले, “राजकारण आणि चित्रपट हे माझ्यासाठी…”
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दीपिकाच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं, “तिथे मॉडेल्स असतात, ज्या कपडे बदलत असतात, विश्रांती घेत असतात आणि तिथे कॅमेऱ्याला अलाऊड नसतो’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “तिथे यांना पहिले कोणी आत जाऊ दिले.” (deepika padukone angry on paparazzi video viral)
हे देखील वाचा – मनसेचा विरोध असतानाही पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट येणार, पहिलं पोस्टर प्रदर्शित
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. शिवाय प्रभाससोबत ‘कल्की 2898 AD’ व हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटांत दिसणार आहे.