शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली दीपिका पदुकोण, स्टेजवर थिरकताना दिसली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 7, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepika Padukone Attends Diljit Dosanjh Concert 

मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली दीपिका पदुकोण,

Deepika Padukone Attends Diljit Dosanjh Concert  : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नाही तर दीपिका तिच्या ग्लॅमरस लूकने नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करते. दीपिकाने सप्टेंबर २०२४ मध्ये तिच्या मुलीला म्हणेजच दुआला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्री प्रथमच सार्वजनिकरित्या दिसली. बेंगळुरूमध्ये गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्रीने हजेरी लावली होती, जिथे ती आरामात बसून त्याच्या सुरांवर नाचत होती. यावेळी पांढरा स्वेटशर्ट आणि निळी जीन्स परिधान केलेल्या दीपिकाच्या चेहऱ्यावर डिलिव्हरीनंतरची चमक स्पष्ट दिसत होती. यावेळी तिचा कॅज्युअल लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला.

कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये ती बसून अप्रतिम कामगिरीचा आनंद घेत आहे, तर तिच्या आजूबाजूचे चाहते बॉलीवूडच्या सुपरस्टारसाठी ओरडत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एकामध्ये दिलजीत दीपिकाला स्टेजवर बोलावतो आणि ती येऊन नाचताना दिसतेय आणि चाहत्यांना नमस्कारही करतेय. दीपिका आणि रणवीर सिंग यांनी ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केले.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची गिनीज बुकमध्ये नोंद होणार, निर्मात्यांनी सांगितलं कारण, म्हणाले, “लवकरच…”

View this post on Instagram

A post shared by elitestanning (@elitestanning)

या जोडप्याने आनंदाची बातमी एका हृदयस्पर्शी सोशल मीडिया पोस्टसह शेअर केली, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, “मुलीचे स्वागत. ८-९-२०२४. दीपिका व रणवीर. तेव्हापासून, दीपिका एक आई म्हणून तिची कर्तव्ये पार पाडताना सार्वजनिक देखाव्यापासून मोठ्या प्रमाणात दूर राहिली आहे. दीपिकाने तिच्या गरोदरपणातही काम सुरु ठेवले आणि तिच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले. मात्र, आई झाल्यानंतर ती लाइमलाइटपासून दूर राहिली.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू आदित्यपासून दुरावणार का?, अनुष्काची चाल यशस्वी, दोघांच्या मैत्रीत फूट पाडली अन्…; प्रोमो समोर

दरम्यान, तिचा पती रणवीर सिंग चाहत्यांशी व मीडियाशी संवाद साधत आहे. रणवीरने नुकतेच वडील झाल्यानंतरच्या आयुष्याविषयी सांगितले. एका कार्यक्रमात आपला आनंद शेअर करताना तो म्हणाला, “मी सध्या जो आनंद अनुभवत आहे. मी बऱ्याच काळापासून वडिलांच्या ड्युटीवर आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांशी बोलण्यास तयार आहे. अभिनेत्याने दीपिकाबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दलही सांगितले आणि तिला जादुई म्हटले”.

Tags: deepika padukoneDeepika Padukone Attends Diljit Dosanjh ConcertDiljit Dosanjh Concert
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar Wedding

तारीख ठरली! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.