दीपिका पदुकोण व रणवीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली. दीपिका व रणवीर हे लवकरच आई-बाबा होणार असल्याचं समोर आलं. तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळाली. हे जोडपे सप्टेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर आता अभिनेत्री दीपिका पती रणवीर आणि संपूर्ण कुटुंबासह कारमधून डिलिव्हरीसाठी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली. दीपिका पदुकोण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Deepika Padukone Admitted)
दीपिकाचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल होताच तिचे चाहते आनंदाची बातमी ऐकण्याची वाट पाहत आहेत. अभिनेत्रीची डिलिव्हरीची तारीख या महिन्यात असल्याचे सांगण्यात आले. दीपिका व रणवीर आता त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. बॉलीवूड पॉवर कपल दीपिका पदुकोण व रणवीर सिंग त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या बातमीने सारे खूश झाले. प्रवेशाच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
हा व्हिडीओ व्हायरल होताच या जोडप्याच्या गुडन्यूजसाठी चाहते उत्सुक झाले आहेत. दोघेही चाहत्यांसह आनंदाची बातमी कधीही शेअर करु शकतात. दीपिका पदुकोणचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेक नेटकरी तिच्या सुरक्षित प्रसूतीसाठी प्रार्थना करत आहेत. व्हिडीओखाली कमेंट करत नेटकरी म्हणाले, “घरी लक्ष्मी येईल अशी भावना आहे”. तर दुसरा म्हणाला, “देव तिला आणि बाळाला आशीर्वाद देईल”. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “गणेश लवकरच दीपवीरच्या घरी येईल” असे भाकीत केले.
दीपिका पदुकोण रुग्णालयात दाखल असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दीपिका रुटीन चेकअपसाठी आली आहे की तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८ साली लग्न केले आणि आता सहा वर्षांनंतर हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे चर्चेत आहे.