शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांनी उडवली अरबाजची टिंगल, निक्कीबरोबरच नातं त्यांनाही खटकतंय आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 8, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi season 5

'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी मांडलं अरबाज पटेलबाबत मत

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती पाहायला मिळत आहेत.‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलंच गाजताना दिसत आहे. या घरातील टास्कमुळे व नवनवीन सदस्यांमुळे पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’ची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. या घरात नेते, अभिनेते ते सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स अशा अनेकांचा समावेश आहे. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर या स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना पाहणं रंजक ठरत आहे.  (Bigg Boss Marathi season 5)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता टीम ए व टीम बी मध्येही वादावादी सुरु असलेली पाहायला मिळत आहे. टीम ए मध्ये गेल्या भाऊच्या धक्क्यापासून वाद सुरु झालेले पाहायला मिळाले. तर टीम बी पात्र एकत्र दिसली. टीम ए मधून निक्की तांबोळीने एक्झिट घेतली असल्याचं पाहायला मिळालं. त्यामागोमाग निक्कीचा जिवलग अरबाज पटेलही निक्की सांगेल ती पूर्वदिशा असं म्हणत तिच्या मागेमागे करु लागला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून अरबाज व निक्की यांची मैत्री पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी गमावली अन् मिळाली आणखी एक मोठी शिक्षा; रितेश देशमुखने पिळले निक्कीचे कान, म्हणाला, “शिक्षेचं पालन केलं नाहीतर…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अरबाज व निक्की यांच्यातील मैत्री कालांतराने इतकी वाढली की त्यांच्यात प्रेम फुलत गेलं. दोघांमधील प्रेम, जवळीक घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांनाही खटकू लागलं. नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस’मधील भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अरबाज व निक्कीची शाळा घेतली. इतकंच नव्हे तर अरबाजला निक्कीच पायपुसणं म्हटलं. इतकं बोलूनही अरबाज काही निक्कीपासून दुरावला नाही. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अरबाज व निक्की एकत्र सोफ्यावर बोलत बसलेले असतात.

आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री घेत येणार हा सदस्य, स्पर्धकाच्या बायकोनेच केला खुलासा, पोस्ट शेअर केली अन्…

अरबाज व निक्की बोलत असतात ते पाहून घरातील इतर सदस्य अरबाजची फिरकी घेतात. पॅडी, अभिजीत, सूरज जर ते अरबाजच्या जागी असते तर त्यांची काय प्रतिक्रिया असती याबाबत गॉसिप केलं. पॅडी म्हणाला, “दोन दिवसांत ब्रेक अप”. तर अभिजीत म्हणाला, “जर ती आयुष्यात असती तर मीच आयुष्यात नसतो”. तर सूरज म्हणाला, “तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस. माझ्या बच्चा हे घे स्पेशल चॉकलेट”, असं म्हणताच सगळे जण हसू लागतात.

Tags: arbaaz patel trollbigg boss marathibigg boss marathi season 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Deepika Padukone Baby Girl

मुलगी झाली हो! गणेशोत्सवादरम्यानच दीपिका-रणवीरच्या घरी चिमुकलीचे आगमन, गोंडस मुलीला दिला जन्म

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.