‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली. या स्पर्धकांमध्ये कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीला रितेश देशमुखने चांगलंच सुनावल असल्याचं पाहायला मिळालं. ही अभिनेत्री म्हणजेच निक्की तांबोळी. निक्की तांबोळीने अगदी पहिल्या दिवसापासून घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. निक्कीचं वागणं, बोलणं, अरेरावीपणा, उद्धटपणा अनेकांना खटकत असल्याचं दिसलं. गेल्याच आठवड्यात निक्कीने केलेला तमाशा अनेकांना खटकला आणि यावरुन रितेशनने निक्कीची चांगलीच शाळा घेतली. गेल्या आठवड्यात निक्कीने घरात एकही काम करणार नसल्याचे सांगत स्वतःची मनमानी केली. (Bigg Boss Marathi season 5)
घरातील इतर स्पर्धकांनी समजावूनही निक्कीने स्वतःच खरं केलं. त्यामुळे रितेश व तिला चांगलंच सुनावलं. इतकंच नव्हे तर घरातील काम करणार नाही म्हणून आर्या बरोबर झालेल्या वादात निक्की आर्यासाठी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं. यावर आर्यानं “बाप काढायचा नाही” असं म्हणत निक्कीला त्याच वेळी उत्तर दिलं. या प्रसंगावरुन निक्कीने हे आर्याच्या वडिलांवरुन केलेलं भाष्य असल्याचं कळतंय. मात्र एखाद्याचा बाप काढणं हे कितपत योग्य आहे असं म्हणत निक्कीला सोशल मीडियावरील बऱ्याच जणांनी ट्रोल केलं. निक्कीची यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर शाळा घेतलीच पाहिजे आणि तिला योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी असं म्हणत अनेकांनी रितेश देशमुखकडे विनंती केली.
नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला खूप मोठी शिक्षा सुनावली. सुरुवातीला तिला भाऊच्या धक्क्यावर बसण्याची परवानगी न देता एका बाजूला बसवण्यात आलं. त्यानंतर रितेश देशमुख म्हणाला की, “मी तुमचं गेल्या आठवड्यात इतकं कौतुक केलं ते तुम्ही जास्तच मनावर घेतलं. कौतुक एकदा डोक्यात गेलं की त्याची हवा होते”, असं म्हणत निक्कीला खडे बोल लगावले. इतकंच नव्हे तर निक्कीला आणखी एक शिक्षा देत असं सांगितलं की, यापुढे तुम्ही या सीझनमध्ये केव्हाही घराच्या कॅप्टन होणार नाही.
आणखी वाचा – ना गळ्यात मंगळसूत्र, ना कपाळाला टिकली; दर्शनासाठी आलेल्या दीपिका पदुकोणचा लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले…
हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आणि त्यानंतर आणखी एक शिक्षा सुनावत रितेश देशमुख म्हणाला की, “या आठवड्यातील घरातील सगळी भांडी निक्की घासणार आणि तिने जर हे काम करायला नकार दिला तर तिला सरळ नॉमिनेट करा”, असं म्हटलं. आता रितेश देशमुखने स्वतः निक्कीवर ही मोठी जबाबदारी सोपवली आणि तिने जर हे काम केलं नाही, या शिक्षेचं पालन केलं नाहीतर तर तिला नॉमिनेट करा असं थेट ‘बिग बॉस’ यांना सांगितलं. एकूणच काय तर निक्कीची रितेश देशमुखने चांगलीच फिरकी घेतली असल्याचं पाहायला मिळालं. आता निक्की स्वतःमध्ये सुधारणा करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.