Bigg Boss Marathi 5 : टेलिव्हिजनवरील सगळ्यात वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. भांडणं, वाद विवाद, मारामारी यामुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. ‘बिग बॉस’ मराठी असो वा हिंदी प्रत्येक शोमध्ये स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नव्या पर्वात अनेक कलाकार उत्तम खेळताना दिसत आहेत तर काहीजणांना हा खेळ सोडावा लागला आहे. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर या स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना पाहणं रंजक ठरत आहे.
हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालत असले तरी वाईल्ड स्पर्धकाच्या एण्ट्रीने आता त्यांचे धागे दणाणणार आहेत. अगदी दुसऱ्या आठवड्यापासूनच या सीझनमध्ये कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं. वाईल्ड कार्ड सदस्याबद्दल अनेक नावे समोर आली. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात खरचं वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा प्रोमो सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा आहे. प्रोमोमध्ये, तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा अस्सल फौलाद घालणार ‘बिग बॉस’च्या घरात राडा, असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणारा हा नवा सदस्य कोण? या प्रश्नाचं कोडं आज सुटणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’मधील छोटा पुढारीचा प्रवास संपला, घराबाहेर जाताना वैभव-अरबाज भावुक
अनेकांनी प्रोमोखाली कमेंट करत कोल्हापूरचा रांगडा गडी संग्राम चौघुले याच नाव घेतलं आहे. इतकंच नव्हे तर संग्राम चौघुलेच्या पत्नीने म्हणजेच स्नेहल चौघुले यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा प्रोमो शेअर करत कलर्स मराठी व ‘बिग बॉस’ला टॅग केलं आहे. यावरुन ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून संग्राम चौघुले येणार असल्याचं निश्चित झालं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आता संग्रामच्या एन्ट्रीने घरात कोणते बदल होणार?, संग्राम वैभव व अरबाजला पुरून उरणार का हे सार पाहणं रंजक ठरेल.
गेल्या आठवड्यात बी बी करन्सीसाठी आणि बी बी फार्ममध्ये सदस्यांनी घातलेला राडा, नियमांचं उल्लंघनाबद्दल रितेश भाऊने सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. छोटा पुढारी घन:श्याम दरवडेने या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतला. आता नव्या सदस्याच्या येण्याने ‘बिग बॉस’च्या घरात काय बदल घडणार हे पाहावे लागेल.