बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपालीच्या अश्रूंचा बांध फुटला; नवरा-लेकाला मिठी मारली अन्…; VIDEO समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2026 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपाली ढसाढसा रडली

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ मधील सध्या सुरू असलेला ‘फॅमिली वीक’ प्रेक्षकांसाठी खास ठरत आहे. अलीकडेच समोर आलेल्या नव्या प्रोमोने मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत. या प्रोमोमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्यासाठी भावनिक क्षण दाखवण्यात आले असले, तरी त्यात एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंगही पाहायला मिळतो. प्रोमोमध्ये दिसतं की, फॅमिली वीकच्या निमित्ताने दिपाली सय्यद हिला भेटण्यासाठी तिचा पती आणि मुलगा ‘बिग बॉस’च्या घरात येतात. आपल्या कुटुंबियांना अचानक समोर पाहताच दिपाली खूपच भावुक होते. अनेक दिवसानंतर त्यांना भेटण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. ती त्यांच्याशी बोलताना भावनांनी भरून येते.

मात्र, या आनंदाच्या क्षणात एक धक्कादायक बातमी तिला कळते. दिपाली सहजपणे तिच्या सासूबद्दल विचारपूस करते, “मम्मी कशा आहेत? ठीक आहेत ना?” असं ती तिच्या पतीला विचारते, यावर तिचा पती काही क्षण शांत राहतो आणि नंतर अत्यंत दुःखी स्वरात सांगतो की, “त्या आता नाहीत.” हे ऐकताच दिपालीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. सासूच्या निधनाची ही बातमी ऐकून दिपाली पूर्णपणे खचते आणि ती रडू लागते. ‘बिग बॉस’च्या घरातच तिला हा मोठा धक्का बसतो, हा प्रोमो पाहून प्रेक्षकही भावुक झाले असून, सोशल मीडियावर अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – अपघातानंतर ‘बिग बॉस’ फेम युट्युबरचा उजवा पाय सुन्न, चालता येणं झालंय कठीण, प्रकृती गंभीर

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या घटनेमुळे ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागांबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. फॅमिली वीकमधील हा प्रसंग कसा दाखवला जाईल आणि दिपाली या परिस्थितीला कशी सामोरी जाईल?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा – ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई; घरी चिमुकल्या परीचं आगमन; पोस्ट शेअर करत म्हणाली, “१० मार्चला मुलीचा जन्म…”

Tags: Bigg Boss Marathi 6marathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Harshil Kalia death

आधी गाडी डिव्हायडरवर चढली आणि नंतर…; ३० वर्षीय अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखचा डोंगर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.