Harshil Kalia death : चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. राजस्थानी मॉडेल आणि अभिनेत्री हर्षिल कालिया हिचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. हर्षिल कालियाच्या कारचा अपघात इतका धक्कादायक होता की, तिला जागीच जीव गमवावा लागला. हर्षिल कालिया यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. जयपूरमध्ये ३० वर्षीय राजस्थानी मॉडेल-अभिनेत्री हर्षिल कालियासोबत हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल हर्षिल कालियाच्या कारला शिप्रा पथ रोडवर अपघात झाला, ज्यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला. हर्षिलसोबत झालेला अपघात इतका भीषण होता की कारचे नियंत्रण सुटले आणि गाडी आधी दुभाजकावर चढली आणि नंतर उलटली.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षिल कालिया रात्री उशिरा कामावरुन घरी जात होती. दरम्यान, शिप्रा पथ रोडवर हर्षिलच्या कारचा अचानक तोल गेला आणि तिची कार दुभाजकावर आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की, धडकेने कार पलटी झाली आणि अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी हर्षिलची गाडी सरळ केली. लोकांनी हर्षिलला गाडीतून बाहेर काढले तेव्हा ती गंभीर जखमी झाली होती. हर्षिलला बाहेर काढल्यानंतर तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आणखी वाचा – सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपालीच्या अश्रूंचा बांध फुटला; नवरा-लेकाला मिठी मारली अन्…; VIDEO समोर
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षिलच्या मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे असे आहे. हर्षिलच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. हर्षिलबद्दल बोलायचे झाले तर हर्षिल कालिया ‘क्राइम नेक्स्ट डोअर’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. याशिवाय हर्षिलने अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे. हर्षिल मॉडेलिंग इंडस्ट्रीत देखील सक्रिय होती आणि सोशल मीडियावर त्याची चांगली फॅन फॉलोइंग होती, परंतु आता ती या जगात नाही. हर्षिलच्या कुटुंबियांनाही तिच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे.





