शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जन्मताच मृत घोषित केलं अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा म्हणाला, “मृत्यूच्या दारातून परतलो…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 10, 2026 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Siddharth Menon Backstory

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Siddharth Menon Backstory : मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ मेनन याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अत्यंत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. जन्मताच मृत घोषित करण्यात आलेल्या सिद्धार्थने आज यशस्वी अभिनय प्रवास केला आहे, त्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. २०२५ साली प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ या चित्रपटातून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आला. या सिनेमात त्याने साकारलेली माधव मेस्त्री ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर ठसली, त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र अभिनयाइतकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच संघर्षमय राहिलं आहे.

सिद्धार्थ मेननने जन्मावेळी आलेला मृत्यूचा क्षण ‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत अंगावर काटा आणणारा प्रसंग उघड केला. तो म्हणाला की, जन्माच्या वेळी त्याला गंभीर अडचणींचा सामना करावा लागला होता. गळ्याभोवती नाळ अडकलेली असल्यामुळे त्याच्या मेंदूपर्यंत साधारण दीड ते दोन मिनिटे रक्तपुरवठा झाला नव्हता. ही परिस्थिती नवजात बाळासाठी अत्यंत धोकादायक असते. या गंभीर स्थितीमुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचंही सिद्धार्थने सांगितलं. मात्र काही वेळानंतर त्याने पुन्हा श्वास घेतला आणि मृत्यूच्या दारातून परत आला.

आणखी वाचा – ३.५ वर्ष रस्त्याचं काम सुरुय, मेडिकल इमर्जन्सी आली तर…; मढ आयलँडच्या रस्त्यावरील ट्राफिकचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री भडकली, म्हणाली…

या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणतो, “मी प्रत्येक वाढदिवसाला स्वतःला आठवण करून देतो की, मी तिथून परत आलो आहे. त्यामुळे आयुष्यात कितीही खालच्या टप्प्यावर गेलो, तरी पुन्हा उभा राहू शकतो.” सिद्धार्थ मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. सुरुवातीला भाषेची अडथळा जाणवत होती. मात्र सहकलाकारांनी आणि दिग्गजांनी त्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी आपल्याला खूप काही शिकवलं. असं सांगत सिद्धार्थने मराठी इंडस्ट्रीतील आपुलकीचा अनुभव शेअर केला. ‘दशावतार’ चित्रपटाची झलक ‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे आणि महेश मांजरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आणखी वाचा – “EMI भरायला, उदरनिर्वाह करायला अभिनय करणार नाही”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितलं कामातून ब्रेक घेण्याचं कारण, म्हणाला…

Tags: marathi actormarathi entertainment newsSiddharth Menon Backstory
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Kamali Serial

'कमळी' मालिकेत मोठा ट्विस्ट, कामिनीला महाजनांनी काढलं घराबाहेर, म्हणाली, "कामिनी आजी घराबाहेर निघा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.