बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या भारतात असलेली बघायला मिळत आहे. मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का तिच्या दोन्ही मुलांसहित लंडनला शिफ्ट होणार असल्याच्या अनेक चर्चादेखील सोशल मीडियावर रंगल्या. मात्र त्यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. अकायच्या जन्मानंतर अनुष्का दोन-तीन वेळा भारतात परतली होती. मात्र कार्यक्रम आटोपल्यानंतर ती पुन्हा लंडनला रवाना झाली होती. अशातच आता अनुष्का पुन्हा एकदा मुंबईमध्ये दिसून आली. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अनुष्का फेरीबोटमध्ये दिसून आली. ती अलिबागमधून परतल्याची माहिती समोर आली आहे. अलिबागमध्ये विराट व अनुष्का यांनी अलिशान घर खरेदी केल्याची चर्चा सुरु आहे. (anushka sharma alibugh home gruhpravesh)
अनुष्काचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ गेट वे इंडिया येथील आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का व विराटच्या अलिबाग येथील घरात गृहप्रवेशाची तयारी सुरु असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एक व्यक्ती पूजेचे व सजावटीचे काही समान मोठ्या पिशव्यांमधून घेऊन जाताना दिसत आहे. दरम्यान १२ जानेवारी रोजी अनुष्का व विराट यांना अलिबागमध्ये स्पॉट केले होते. त्यांनी जाण्याच्यावेळी चाहत्यांना बघून अभिवादनही केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्री सकाळी लवकर गेट वे येथे दिसून आली.
त्यावेळीदेखील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती रस्ता ओलांडताना लोकांना सतर्क करताना दिसत आहे. ती म्हणाली की, “आरामात या, बस येत आहे”. तिच्या या वर्तवणुकीचं खूप कौतुकदेखील केलं गेलं. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अलिबागमध्ये फार्महाऊस घेण्यासाठी बॉलिवूडकर अधिक उत्साही असलेले दिसतात. किंग खान शाहरुख खानचे देखील मोठे फार्महाऊस बघायला मिळते. अनेकदा तो कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी अलिबाग येथे जाताना बघायला मिळतो.
दरम्यान आता अनुष्कादेखील अलिबागकर होणार यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काने कुटुंबासहित महाराज प्रेमानंद यांचीदेखील भेट घेतली होती. विराट-अनुष्का वामिका व अकायदेखील दिसून आले. त्यांचा हा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.