सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर विवाहगांठ बांधली. आमिर खानची लेक आयरा खानदेखील बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर नुकतीच विवाहबंधनात अडकली. प्रथमेश-मुग्धा, स्वानंद-गौतमी, स्वानंदी-आशिष, सोनल-समीर, सुरुची-पियुष या लोकप्रिय कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता मराठीतील आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. (Rishi Manohar On Instagram)
‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता ऋषी मनोहर लवकरच विवाहबद्ध होणार आहे. या नाटकामध्ये ऋषीसह अभिनेता उमेश कामत, ऋता दुर्गुळे व आरती मोरे यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. दादा एक गुडन्यूज आहे या नाटकामुळे ऋषी बराच लोकपिय झाला. गेल्यावर्षी मे महिन्यात त्याचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये व्याहीभोजनाचा खास व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लग्न करणार असल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांच्या व्याही भोजनाचा खास सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नुकतेच त्याने त्याच्या ग्रहमख व मेहेंदी सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे. तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने सुंदर नक्षीकाम असलेला ड्रेस परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ऋषीने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओमध्ये त्याचे मित्रपरिवार व कुटुंबीय सहभागी झाल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “बिकिनी घाल”, बायकोला विचित्र सल्ला देणाऱ्यावर भडकला सिद्धार्थ चांदेकर, म्हणाला, “तुमचे अहो घरी तुम्हाला…”
दरम्यान, ऋषी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पौर्णिमा गानू मनोहर यांचा लेक आहे. तर ऋषीच्या होणाऱ्या बायकोचं नाव तन्मई असं आहे आणि ती एक दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम पाहते. ऋषीने शेअर केलेल्या या फोटोवर हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊतसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे कौतुक केले आहे. तर ऋषीच्या अनेक चाहत्यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.