मराठी सिनेसृष्टीत सध्या जोरदार लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सुरुची अडारकर-पियुष रानडे, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या लोकप्रिय जोड्या अखेर लग्नबंधनात अडकल्या. एकामागोमाग एक कलाकार जोड्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. यापाठोपाठ आता आणखी एक मराठमोळा अभिनेता बोहोल्यावर चढला आहे. हा अभिनेता म्हणजे ऋषी मनोहर. अनेक नाटक, चित्रपटांमधून ऋषीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Rishi Manohar Wedding)
‘दादा एक गुडन्यूज आहे’ फेम अभिनेता ऋषी मनोहरचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. ‘दादा एक गुडन्यूज आहे’ फेम अभिनेता पुण्यातील एका वाड्यात लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आलेले पहायला मिळत आहेत. अभिनेत्याने त्याची मैत्रीण तन्मयी पेंडसे हिच्यासह लग्न केले आहे. २०२३मध्ये या ऋषी व तन्मयीने साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. ऋषीची पत्नी तन्मयी पेशाने डेंटिस्ट आहे.
ऋषी व तन्मयीच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटो, व्हिडीओही चांगलेच व्हायरल झाले. हळदी, संगीत सोहळ्यात दोघांनीही धमाल मस्ती केलेली पाहायला मिळाली. दोघांचे लग्नसोहळ्यातील खास रोमँटिक पोज देतनाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. अभिनेत्री ऋता दुर्गुळेने त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो शेअर करत या जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषीने आजवर त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
ऋषी मनोहर प्रमाणेच त्याची आई मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऋषी हा पौर्णिमा गानू मनोहर यांचा लेक आहे. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘सुराज्य’, ‘तुझं माझं जमेना’, ‘पेट पुराण’, ‘वाडा चिरेबंदी’ यांसारख्या अनेक मालिका, नाटकांमध्ये पौर्णिमा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.