अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आजवर तिच्या बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. विविधांगी भूमिका साकारत सईने तिचा असा स्वतःचा चाहतावर्गही तयार केला आहे. अभिनयाच्या जोरावर तर सईने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. याशिवाय हटके फोटोशूटमुळे ही ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच काही ना काही हटके फोटोशूट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Saie Tamhankar New Role)
हटके फोटोशूटमुळे सई बरेचदा ट्रोलही झाली आहे. बरेचदा अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकली आहे. काही वेळेला अभिनेत्रीने नेटकऱ्यांच्या कमेंटकडे दुर्लक्ष केलं आहे तर कित्येकदा नेटकऱ्यांच्या कमेंटला सडेतोड उत्तरही दिलं आहे. नेटकऱ्यांच्या कचाट्यात अभिनेत्री अडकली तरी तिने अभिनयावर त्याचा काही प्रभाव पडू दिला नाही. अभिनयात सईने कायमच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
नवीन वर्षात कोणती महत्त्वाकांक्षी भूमिका साकारायची असा प्रश्न सईला विचारला असता, अभिनेत्री म्हणाली, “आजवर सईने विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र आताच्या या नव्या वर्षात सईला नेमकी कोणती भूमिका करायची इच्छा आहे याबाबत नुकत्याच मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने भाष्य केलं. सैल माझ्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात प्रत्येक स्क्रीनवर मी विविधांगी काम करताना दिसेन” असं अभिनेत्री म्हणाली.
सई पुढे म्हणाली, “मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट. वेबसीरिज व टेलिव्हीजनवरही मी असणारच आहे. माध्यम कोणतंही असो; सातत्यानं काम करत राहायचंय. वर म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकवेळी नवीन ‘सई’ तुम्हाला दिसेल. काही चरित्रभूमिका मला साकारायच्या आहेत. त्यासाठीची तयारी मी करतेय. एक भूमिका मला प्रचंड खुणावतेय ती म्हणजे; सावित्रीबाई फुले. त्यांचा चरित्रपट करायला मला आवडेल” असंही ती म्हणाली.