बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

असा होता भारतीच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस, अमिताभ बच्चन यांचे घरही दाखवले अन्…; खास व्हिडीओ केला शेअर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 10, 2024 | 3:09 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Comedy actress bharti singh gets emotional on son golla laksh first day at school

असा होता भारतीच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस, अमिताभ बच्चन यांचे घरही दाखवले अन्...; खास व्हिडीओ केला शेअर

हिंदी विनोदी विश्वातील सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे भारती सिंह. विनोदाची अचूक जाण असणाऱ्या भारतीने तिने कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात लाफ्टर क्वीन अशी एक वेगळी ओळख मिळवली आहे. २०१७ मध्ये भारतीने हर्ष लिंबाचियासह विवाह केला. यानंतर ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. भारती व हर्षने आपल्या लाडक्या लेकाचं नाव ‘लक्ष’ असं ठेवलं आहे. हर्ष-भारती त्यांच्या लेकाला लाडाने गोला असंही म्हणतात.

अशातच त्यांच्या लाडक्या लेकाचा आज शाळेचा पहिला दिवस असून भारतीने तिच्या व्लॉगमधून लेकाच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओत ती काही ठिकाणी भावुक झाली असल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी ती भावुक होत असं म्हणते की, “मला यांची चिंता लागून राहिली आहे. माझ्यापेक्षा रुपा दीदीला (भारतीची मदतनीस) त्याची काळजी वाटत आहे. तो शाळेत एकटा बसणार कसा? एकटा खाणार कसा?. पण मला वाटतं प्रत्येक आईबाबत हे असं होतं. माहीत नाही पण मनात आपल्या मुलाविषयी कसंतरी होतं.”

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

आणखी वाचा – Video : सचिन पिळगांवकरांनी शेअर केला ‘नवरा माझा नवसाचा २’ शूटचा पहिला व्हिडीओ, प्रेक्षकांना आठवले अशोक सराफ कारण…

यानंतर पुढे ते भारती व हर्ष लेकाच्या शाळा सुटण्याची वाट बघत असतात. त्यानंतर त्याची शाळा सुटताच ते त्याला घेऊन घरी येताना खूप मजा मस्ती करतात. यावेळी त्यांना वाटेत अमिताभ बच्चन यांचे घरही दिसते. तसेच ते दोघे त्यांच्या लाडक्या लेकाला घेऊन शॉपिंगलाही जातात. तिथे त्याच्यासाठी खास खेळणी विकत घेतात.

आणखी वाचा – मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल, छातीमध्ये दुखू लागले अन्…; कोलकातामध्ये उपचार सुरू

दरम्यान, भारतीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. भारती व हर्षची पडद्यावरील केमिस्ट्री चाहत्यांना कायमच आवडते. त्याचबरोबर व्लॉगच्या माध्यमातूनही ते चाहत्यांच्या चांगलेच संपर्कात राहतात आणि त्यांच्या या व्लॉगला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो.

Tags: Bharti Singhbollywood actressBollywood entertainment newsbollywood newscomedy actressentertainment newsबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीभारती सिंहमनोरंजन बातमीविनोदी अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
snehal shidam new movie

"हिंदी सिनेमात…", विलेपार्लेच्या चाळीत राहणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीचं शाहिद कपूरबरोबर काम, म्हणाली, "आनंद होतो की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.