रंग माझा वेगळा या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत पुन्हा दीपा-कार्तिकमध्ये दुरावा पाहायला मिळतोय. साक्षीच्या खुनाचा आरोप हा कार्तिकवर आला असून कार्तिकला १४ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.(Rang Maza Vegla)
स्पृहा आणि मैत्रीयीला कलाकारांचा भावुक निरोप(Rang Maza Vegla)
तर काही दिवसांवपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार आता मालिकेचे कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. तर या प्रोमोत दीपिका आणि कार्तिकी मोठ्या झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे आता मालिकेतून छोट्या दीपिका आणि कार्तिकी म्हणजेच बालकलाकार स्पृहा दळी आणि मैत्रेयी दाते यांची एक्झिट होणार आहे. त्यांचा शेवटचा भाग प्रसारीत झाला आहे. या निमित्ताने स्पृहाआणि मैत्रीहीने इंस्टाग्रामवर सेटवरील काही शेवटचे क्षण केलेत.(Rang Maza Vegla)

मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे लहान दीपिका आणि कार्तिकी यांचा ट्रॅक संपलाय. आता दीपिका आणि कार्तिकी या मोठ्या झाल्या आहेत. यामुळे लहान स्पृहा आणि मैत्रीही यांच्यासाठी शेवटच्या दिवशी खास सेलिब्रेशन करण्यात आलं.या वेळी सेटवर केक कापण्यात आला तसेच त्यांच्या अभिनयाचं सर्वच कलाकारांनी कौतुक केलं आहे. तर या दोघीनींही सोशल मीडियावर त्यांच्या फेअरवेलचे फोटो व्हिडीओ शेअर केले आहेत,यासोबतच प्रेक्षकांचे, सहकलाकारांचे आभार मानत त्यांनी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. तसेच चाहत्यांनी देखील त्यांच्या भूमिकेचे कौतुक करत तुम्हाला आम्ही मिस करू अश्या कॉमेंट केल्या आहेत.
====
हे देखील वाचा – मल्टीटॅलेंटेड भाऊ! अभिनय, गायन, आणि आता भाऊंच्या वादनाच्या कलेचं कौतुक
====
तर रंग माझा वेगळ्या या मालिकेत कार्तिकी आणि दीपिका कोणत्या अभिनेत्री साकारणार हे देखील पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.तर आता कार्तिकी आणि दीपिका मोठ्या झाल्या असून यांची भूमिका अनुष्का पिंपुटकर आणि तनिष्का विषे या साकारणार आहेत. नुकतंच या मालिकेच्या प्रोमोत या अभिनेत्री कार्तिकी आणि दीपिकाच्या भूमिकेत दिसल्या. तर हा प्रोमो पाहून अनेक चाहते आनंदी झालेत तर काहींनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली.(Rang Maza Vegla)

या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही कार्तिकीच्या भूमिकेत झळकणार आहे. या आधी ती कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती तर, यातील तिची सुहानी भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. यासोबतच तनिष्का विषे ही दीपिकाच्या भूमिकेत जाळणार असून तिने काही नाटक,वेब सिरीज यांमध्ये काम केलं आहे. तर या मालिकेत आता सर्वच पात्रांचे लूक देखील वेगळे पाहायला मिळणार आहेत.