सध्या एकपेक्षा एक अनेक बालकलाकार सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत.काही कलाकार तर सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके झाले होते. आता तीच बच्चेकंपनी मालिकांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.या बालकलाकारांमध्ये एक नाव नक्कीच आवर्जून घेतलं जात ती म्हणजे मायरा वैकुल. मायरा सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचली.(mayra vaikul )
त्यांनंतर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून परीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या जोडीला जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम मायराला देखील मिळालं. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेम मिळण्याचं मायरा ही देखील महत्वाचं कारण होत.मायराचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.प्रेक्षकांना त्याच्या लाडक्या कलाकारांविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची कायमच उत्सुकता असते.
पाहा काय म्हणाले मायराचे आई-वडिल? (mayra vaikul)
बालकलाकार म्हंटल की हा प्रश्न कायमच पडतो की, शूट आणि शाळा ही तारेवरची कसरत मुलं कशी सांभाळतात, त्यामुळे मायराच्या शाळेचं काय हा प्रश्न बऱ्याचदा विचारला होता, यावर मायराच्या आई बाबांनी आता उत्तर दिलं आहे ते म्हणाले,मायराची शाळा बदलली आहे आणि तिची नवीन शाळा २० जुलैला सुरु होणार आहे.शाळा बदल्यामुळे मायराला मोठी सुट्टी मिळाली आहे.आणि तिच्या या सुट्टीनुसार आम्ही तीच शूट शेड्युल केलं आहे.

पालक म्हणून शूटमध्ये देखील तिची शाळा मिस होऊ नये याची आम्ही काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या वेळी मायरा नर्सरी मध्ये तेव्हा तिची शाळा ऑनलाईन होती, ते लेक्चर अभ्यास ती सेटवर करायची त्यानंतर शाळा सुरु झाल्या वर ती संध्याकाळी शूट साठी जायची तर शूट याबरोबर तिची शाळा,तिची तब्येत आणि तिच्या वयात तिने जे सर्व तिने केलं पाहिजे ते तिला करायला मिळावं याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. तसेच सध्या मायाराची अभिनेत्री स्नेहा वाघ सोबत नीरजा नावाची हिंदी मालिका सुरु आहे.
हे देखील वाचा : पावनखिंडच यश ठरलं घराचं निमित्त-ही आहे अभिनेते अजय पुरकर यांच्या घराची गोष्ट