शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी मॅरेज मटेरियल नाही”, ‘छावा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण, म्हणाला, “माझं आयुष्य…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2025 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
akshaye khanna on his marriage

अक्षय खन्नाने लग्न का केलं नाही?, अभिनेत्याने सांगितलं नेमकं कारण

‘ताल, ‘रेस’, ‘हलचल’, ‘इत्तेफाक’ आणि ‘दृश्यम २’सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयासाठी प्रशंसा मिळवणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय आगामी ‘छावा’ या चित्रपटातून अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो औरंगजेबाची भूमिका साकारतोय. लाइमलाइटपासून दूर असलेल्या अक्षयला त्याचं खासगीपण जपायला खूप आवडतं. तो लवकरच वयाची पन्नाशी गाठणार आहे, मात्र अद्याप त्याने लग्न केलं नाही. यामागचं कारण त्याने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय खन्नाने स्वत:च्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. (akshaye khanna on his marriage)

याबद्दल तो असं म्हणाला की, “मी स्वत:ला विवाहित या दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट असते, ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात बरेच बदल होतात. लग्नामुळे बरंच काही बदलतं. मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणात असलेलं आवडतं. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करता, तेव्हा स्वत:च्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते”.

View this post on Instagram

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

आणखी वाचा – “माझा किंवा माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात”, X वरील बनावट पोस्ट पाहून सोनू निगम संतापला, म्हणाला, “प्रशासन, सरकार शांत आहेत आणि…”

यापुढे त्याने लग्न न करता मुलांना दत्तक घेण्याबद्दल आणि सरोगसीबद्दल असं म्हटलं की, “मी त्या आयुष्यासाठी तयार नाही. मला माझं आयुष्य कोणाबरोबर शेअर करायचं नाही. मग ते लग्न असो किंवा मुलंबाळं असो. त्यांच्यामुळेही तुमच्या आयुष्यात बरेच बदल होतात. आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे जे बदल होतात, ते मला नको आहे. मला जे हवं, ते त्यातून मिळणार नाही. मला वाटत नाही की मी भविष्यातही ते करायला तयार असेन”.

आणखी वाचा – Video : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, व्हिडीओ व्हायरल

अक्षय त्याच्या आगामी छावा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय विषयी असं म्हटलं की, “तो खूप चांगला माणूस आहे. “तो काही मोजकेच प्रोजेक्ट करतो, पण तो जे काही करतो ते तो मनापासून करतो”. त्यामुळे आता ‘छावा’मध्ये त्याची भूमिका पाहण्यासाठी अनेक चाहते मंडळी उत्सुक असतील हे नक्की

Tags: akshaye khannaakshaye khanna on his marriagewhy akshaye khanna not married
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Gurucharan Singh now wants to start working

आजारपणानंतर गुरुचरण सिंह पुन्हा 'तारक मेहता…'मध्ये परतणार, निर्मात्यांकडे काम मागत म्हणाला, "एक कलाकार म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.