आपल्या अभिनयामुळे लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचे नाव अग्रगण्य आहे. विकीने अभिनेत्री कतरीना कैफबरोबर विवाहगाठ बांधली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ हे इंडस्ट्रीतील एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते. अभिनेता सध्या त्याच्या आगामी छावा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्याने त्याची पत्नी कतरिनाबरोबरच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. अभिनेत्याने पत्नी कतरीनाची नाना पाटेकरांशी तुला केली आहे. तसंच अभिनेता पत्नीला नाना पाटेकरांच्या एका प्रसिद्ध संवादाने सुद्धा हाक मारतो. (Vicky Kaushal on Katrina Kaif)
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमात चाहत्याने त्याला विचारले की, “त्याला त्याच्या पत्नीचे कोणते चित्रपट आवडतात?”. याला उत्तर देताना, अभिनेत्याने ‘सिंग इज किंग’ आणि ‘वेलकम’ अशी नावे घेतली. तो म्हणला की, “त्याला हे दोन्ही चित्रपट मनोरंजक वाटतात”. यापुढे विकीने खुलासा केला की, तो अनेकदा त्याच्या आवडत्या ‘वेलकम इन’ या चित्रपटामधील एक संवाद घरी कतरिनाला ऐकवतो. हा संवाद दुसरा तिसरा कुणाचा नसून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा प्रसिद्ध संवाद ‘कंट्रोल उदय कंट्रोल’ हा आहे.
आणखी वाचा – 08 February Horoscope : नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारचा दिवस शुभ, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…
अभिनेता गंमतीने कधीकधी आपल्या पत्नीला म्हणतो, कधी कधी जेव्हा आमच्यात काही घडते तेव्हा मी तिला “कंट्रोल उदय कंट्रोल” असं म्हणतो. विकी-कतरीना यांच्या नात्याबद्दल सांगयचे झाले तर काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले. लग्न होईपर्यंत दोघांनीही त्यांचे नाते उघड केले नव्हते.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पहिला फोटो समोर
विकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या आगामी ‘छावा’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चाहते मंडळी चांगलेच उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना देखील आहेत. त्या १४ फेब्रुवारीला विकी कौशलचा छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.