Sunita Ahuja On Govinda : गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा गोविंदावर भाष्य करण्यापासून कधीच मागे पडत नाही. आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये तिने गोविंदाबद्दल अनेक साक्षात्कार केले आहेत. यानंतर आता अलीकडेच सुनीताने गोविंदबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. गोविंदाने असे सांगितले आहे की, गोविंदाला मूर्ख लोक अधिक आवडतात. तो रात्री अडीच वाजेपर्यंत अशा लोकांबरोबर बसला आहे, जे त्याच्या प्रत्येक वाक्याला होकार देतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनीता अहुजा हिने गोविंदाच्या विक्षिप्त वागणुकीबद्दल स्पष्टपणे भाष्य केलं आहे. सध्या नवऱ्याबाबत तिने केलेलं हे अजब वक्तव्य अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
सुनीताने ‘कर्ली टेल्स’ यांच्या संभाषणात असे म्हटले आहे की, गोविंदा ज्यांच्याशी तासंतास बोलत असतात त्यांनाही त्यांचं हे बोलणं आवडत नाही. सुनीताने सांगितले की, ती सकाळी साडेतीन वाजता उठली. गोविंदा काम करत असल्याने, त्याच्या झोपेचे चक्र पूर्णपणे ढासळले आहे आणि आजपर्यंत ते ढासळलेलं आहे”. सुनीता म्हणाली, “गोविंदा रात्री अडीच वाजता झोपतो. तो नेहमीच असा असतो कारण तो सतत अगदी २४ तास काम करत असे. आता ही त्याची सवय झाली आहे”.
सुनिताच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा गोविंदा रात्री अडीच वाजता लोकांबरोबर गप्पा मारत बसतात. सुनीता म्हणाली की, ती आणि गोविंदा पूर्णपणे भिन्न आहेत. ती कमी बोलते, तर गोविंदा खूप बोलतो. तिला तिची उर्जा अनावश्यकपणे वाया घालवणे आवडत नाही. सुनीता म्हणाली, “मला कमी बोलणे आवडते कारण मला मूर्ख लोकांवर माझी उर्जा वाया घालवायला आवडत नाही. आणि गोविंदाला मूर्ख लोक आवडतात. म्हणून चार मूर्ख लोकांबरोबर तो बसतो आणि गप्पा मारतो हे काही मला आवडत नाही”.
सुनीता आहुजा म्हणाली की, तिला आपली उर्जा पूजा-प्रार्थनेत ठेवण्यास आवडते. सुनिताने असेही सांगितले की, ती गेल्या १२ वर्षांपासून एकटाच आपला वाढदिवस साजरा करीत आहे. सुनीता म्हणाली की तिने आपल्या आयुष्याची बरीच वर्षे मुलांना दिली. आता ती मोठी झाली आहेत, म्हणून सुनीताला स्वतःसाठी जगायचे आहे.