रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता झाला बाबा, घरी चिमुकल्याचे आगमन, पहिला फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 20, 2025 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ankur wadhave baby boy

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता झाला बाबा, घरी चिमुकल्याचे आगमन, पहिला फोटो समोर

ankur wadhave baby boy : अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना आनंदाची, सुख-दुःखाची बातमी देत असतात. आणि चाहतेही या कलाकारांच्या आनंदात सहभागी होतात. बरेचदा ही मंडळी घर घेतल्याची, गाडी घेतल्याची, आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी देतात. यांत आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने बाबा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अंकुर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. हा अभिनेता म्हणजे चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे. अंकुरने फेसबुक पोस्ट शेअर करत दुसऱ्यांदा बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली.

‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे अंकुरला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सिनेसृष्टीत कोणताही वारसा हक्क नसताना त्याने स्वतःच स्थान निर्माण केलं. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोबरोबरच तो अनेक चित्रपटांमध्येही झळकला आहे. अंकुर अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. २८ जून २०१९ रोजी अंकुर लग्नबंधनात अडकला. त्यानं २०२१ मध्ये त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. त्यानंतर आता लग्नाच्या सहा वर्षांनी अंकुर दुसऱ्यांदा बाबा झाला.

आणखी वाचा – “वयाच्या ४१व्या धनत्रयोदशीचा अर्थ समजला”, पारू फेम अभिनेत्याच्या पत्नीने मागितली माफी, म्हणाली, “सोनं-चांदी…”

“दुसऱ्यांदा बाबा झालो यावेळी मुलगा झाला”, असं कॅप्शन देत त्याने ही आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये त्याच्या मुलाचा हात हातात घेतल्याचा फोटो पाहायला मिळत आहे. अगदी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अंकुरने ही आनंदाची बातमी दिली आहे. अंकुरने दिलेल्या या गोड बातमीवर अनेकजण कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

आणखी वाचा – जिनिलिया देशमुखचं पुतणीबरोबर आहे खास बॉण्डिंग, धनत्रयोदशीला औक्षण करताच अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी अन्…; व्हिडीओ व्हायरल

अंकुर ‘चला हवा येऊ द्या’मुळे घराघरांत पोहोचला. याशिवाय त्याने ‘पुढं त्याने गेलो गाव’, ‘गाढवाचं लग्न’, ‘सर्किट हाऊस’, ‘आम्ही सारे फर्स्ट क्लास’, ‘सायलेन्स’, ‘कन्हैय्या’ यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्याने काम केलं होतं. याशिवाय अंकुर उत्तम कवी देखील आहे.

Tags: Ankur Wadhavechala hawa yeu dyamarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Deepika Padukone Ranveer Singh Daughter

दीपिका पदुकोण की रणवीर सिंग, दुआ कोणासारखी दिसते?, नेटकरी म्हणाले, "चेहरा वडिलांवर गेला आहे पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.