रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका पदुकोण की रणवीर सिंग, दुआ कोणासारखी दिसते?, नेटकरी म्हणाले, “चेहरा वडिलांवर गेला आहे पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2025 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepika Padukone Ranveer Singh Daughter

दीपिका पदुकोण की रणवीर सिंग, दुआ कोणासारखी दिसते?, नेटकरी म्हणाले, "चेहरा वडिलांवर गेला आहे पण..."

Deepika Padukone Ranveer Singh Daughter : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळीच्या दिवसांतच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांनी दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या शुभ मुहूर्तावर लेक दुआचा चेहरा साऱ्या जगाला दाखवला आहे. दीपिका आणि रणवीरने शेअर केलेल्या या खास फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली. त्यांनी रणवीर आणि दीपिकाचे बालपणीचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. आणि यावरुन त्यांची लेक कोणासारखी दिसतेय यावर चर्चा सुरु झाली. हे फोटो पाहून कोणी म्हणतंय की ती दीपिकासारखी दिसत आहे तर कोणी म्हणत आहे की, तिची रंगरेषाही वडील रणवीरवर गेली आहेत.

त्यानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लाडक्या दुआची झलक शेअर केली आहे. यावर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकजण म्हणाला, “दीपिकासारख हसू, रणवीरसारखा चेहरा”. तर दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, “ती तिच्या वडिलांसारखी दिसते, पण तिचे कान तिच्या आईसारखे आहेत”. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, “उंच उंची, डिंपल्स, गोंडस कान, दीपिकासारखे डोळे, बाकी सर्व काही रणवीरसारखे. दोन्हीचे मिश्रण”.

आणखी वाचा – “वयाच्या ४१व्या धनत्रयोदशीचा अर्थ समजला”, पारू फेम अभिनेत्याच्या पत्नीने मागितली माफी, म्हणाली, “सोनं-चांदी…”

View this post on Instagram

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

या फोटोंमध्ये आई आणि मुलगी दोघीही लाल रंगाच्या कपड्यात ट्विनिंग करताना दिसल्या आहेत. दुआने पोनीटेल बांधला आहे. कपाळावर छोटीशी बिंदी लावून दुआ कधी हसताना दिसली आहे तर कधी बोटाने इशारा करताना दिसत आहे. एका फोटोत तर ती हात जोडून आईच्या मांडीवर आहे. आणि पूजा करण्यात व्यस्त आहे. अनेक वर्षे डेट केल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने २०१८ मध्ये लग्न केले. दुआच्या जन्मानंतर सुमारे दोन महिन्यांनी त्याने आपल्या मुलीचे नाव उघड केले. दुआ म्हणजे प्रार्थना.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता झाला बाबा, घरी चिमुकल्याचे आगमन, पहिला फोटो समोर

बॉलीवूडचं स्टार कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर-दीपिकाला ८ सप्टेंबर २०२४ रोजी गोंडस मुलगी झाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिका पादुकोणने घरात लक्ष्मी आल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. आज वर्षभराने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दीपिका-रणवीरने त्यांच्या घरच्या लक्ष्मीचा म्हणजेच दुआचा फेस सोशल मीडियावर रिव्हिल केला आहे.

Tags: bollywood newsdeepika padukoneRanveer Singh Daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Monika Dabade Daughter

इतकी सुंदर व गोंडस आहे मोनिका दबडेची लेक, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.