कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बरेचदा काही कलाकार मंडळी स्वतःहून चाहत्यांसह वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती शेअर करत असतात. तर काही कलाकार त्यांच्या कुटुंबाला लांब ठेवणं पसंत करतात. अशातच एक मराठमोळा, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता निलेश साबळे हा देखील त्याच्या कुटुंबाला सोशल मीडियापासून वा झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवतो. निलेशनेही त्याच्या पत्नी व लेकीला या झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवलं असल्याचं पाहायला मिळतं. (Nilesh Sable Daughter Video)
सिनेसृष्टीपासून निलेशची लेक व पत्नी दूर असली तरी त्याने लेकीचा चेहरा सोशल मीडियावरुन दाखवला आहे. निलेश आणि गौरी २०१३ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर त्यांनी लेक झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. रेवा असं त्यांच्या लेकीचं नाव आहे. निलेश व त्याची पत्नी गौरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच दोघेही काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. निलेशची पत्नी ही पेशाने डॉक्टर असून ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
आणखी वाचा – देशमुखांच्या घरात पडणार फूट? संजनाने उभारली वेगळी गुढी, अनिरुद्धचा राग अनावर
अशातच गौरीने शेअर केलेलता इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. गुढीपाडव्यानिमित्त गौरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन लेकीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. “गुढी पाडव्यानिमित्त माझ्या लेकीने रेवाने काढलेली फुलांची रांगोळी”, असं कॅप्शन देत रेवाचा फुलांची रांगोळी काढतानाचा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. रेवाने काढलेल्या रांगोळीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं भरभरुन कौतुक केलं आहे.
निलेशची लेक रेवा दिसायला खूप सुंदर व गोड आहे. याआधी रेवाबरोबरचे फोटो शेअर करत त्याने तिची झलक शेअर केली आहे. निलेशपेक्षा त्याची पत्नी गौरी सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेली पाहायला मिळते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना गौरी व निलेश यांची भेट झाली होती. निलेश व गौरी दोघेही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्याचबरोबर गौरी एक गायकही आहे.