शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भाऊ कदम यांनी गाडी थांबवून घेतली चाहत्यांची भेट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “देव माणूस…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 15, 2024 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chala Hawa Yeu Dya fame Comedy actor Bhau Kadam shared a video fans who excite to take photo with him

भाऊ कदम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक दाम्पत्य त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणारा विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’शिवाय ‘टाइमपास’, ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही भाऊ कदम झळकले आहेत. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ या शोने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. या शोमध्ये भाऊ कदम यांनी नानाविध भूमिका साकारल्या आहेत, या शोमधील त्यांच्या भूमिका व विनोदी अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे भाऊ कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. (Bhau Kadam Fan Meet)

सोशल मीडियावर भाऊ कदम आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यानी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भाऊ कदम यांनी आजवर अनेक विनोदी व गंभीर भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रभरात त्यांचा चाहतावर्ग आहे. अनेकजण त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात. अशातच त्यांनी एका वयस्कर प्रेक्षकांच्या भेटीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shraddha Hande (@shraddha.hande25)

आणखी वाचा – परदेशातही मुग्धा-प्रथमेश घेत आहेत भारतीय पदार्थांचा आस्वाद, खास फोटो शेअर करत म्हणाले, “कार्तिकी एकादशीच्या दिवशी…”

भाऊ कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक दाम्पत्य भाऊ कदम यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक आहेत आणि भाऊ कदमही त्यांना आनंदाने फोटो देत आहेत. तसंच भाऊ कदम हे त्यांची विचारपुसही करत आहेत. तसंच भाऊ कदम यांना व्हिडीओतील महिला त्यांच्या घरी येण्याची विचारणा करतात आणि त्यावर भाऊ कदमही त्यांना होकार देतात. भाऊ कदम यांची सहकलाकार. अभिनेत्री श्रद्धा हांडेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. भाऊ कदमांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – नवज्योत सिंग सिद्धू यांनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला? पाच वर्षांनी सांगितले नेमकं कारण, म्हणाले, “राजकीय…”

दरम्यान, भाऊ कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत भाऊ कदम यांच्या कृतीचे कौतुक केलं आहे. “मीसुद्धा भाऊ कदम यांना भेटलो आहे, ते खूपच छान व्यक्ती आहेत.  गणपती बाप्पावर तुमचा कायम आशीर्वाद राहो”, “भाऊ कदम अशीच माणुसकी राहूदे. तुम्ही आयुष्यभर असंच हसत रहा”, “कलियुगातील माझा आणि मी ओळखलेला देव माणूस” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.         

Tags: Bhau Kadam Fan MeetBhau Kadam NewsChala Hawa Yeu Dya Fame Bhau Kadam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan

"आम्हाला आधीचा सूरज पाहिजे…", सूरज चव्हाणचा 'तो' व्हिडीओ पाहून चाहत्यांची नाराजी, म्हणाले, "कोणाचं ऐकून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.