‘यार सुनयना….’ पत्नीचा अमेरिका दौरा, कुशलची भावुक पोस्ट

Kaushal Badrike Wife
Kaushal Badrike Wife

सध्या अनेक कलाकारांचा परदेश दौरा पाहायला मिळतोय. काही फिरायला जातात तर काही जण कामानिमित्त. असंच एक परदेश दौरा सध्या पाहायला मिळतोय अभिनेता कुशल बद्रिकेची पत्नी सुनयना बद्रिकेचा. चला हवा येऊ द्या या कर्यक्रमातून लोकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता कुशल बद्रिके आपल्या सगळ्यांच्या चांगल्याच ओळखीचा आहे. कुशलची प्रदेश वारी नेहमी असतेच पण आता सुनयना तिच्या कार्यक्रम साठी प्रदेशात चालली आहे आणि तिच्या या दौऱ्याबद्दल कुशल ने एक पोस्ट सुद्दा केली आहे.(Kaushal Badrike Wife)

(Kaushal Badrike Wife)


आणि कुशल म्हणाला..

एअरपोर्ट वरील काही फोटो पोस्ट करत कुशल ने कॅप्शन मध्ये लिहिले आहे.” यार सुनयना, तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार..😎 जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा”🤓 खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस. बाकी तू परत येशील तेंव्हां…..
हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल 😅😅 काय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल….आणि मी……….. मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून) तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार 🙏🏻🌸 आणि मुघलांनी अमेरिके वर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा.’

iamge credit : instagram (kushal badrike)

कुशल बद्रिकेच्या या पोस्ट वर मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी सुनयनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार ने कमेंट करत ‘ अगं किती गोड लिहिलंयस.. कुशल 😘 आणि सुनयना साठी 👏👏👏ग्रेट वाटतंय.. शाब्बास पठ्ठे’ सुनयनाला शुभेच्छा दिल्या आहेत तर. विजू माने यांनी शुभेच्छा देत ” सुनयना ‘अमेरिका जिंकून ये. लवकर ये. कुशलच्या विरह कविता ऐकाव्या लागायच्या आत परत ये. (खरंतर एव्हाना पहिली कविता झालीही असेल.) अशी मजेशीर कमेंट देखील केली आहे.
विशाखा सुभेदार, विजू माने यांच्या सोबत सुरुची आरडकर, नम्रता संभेराव, यांनी देखील कमेंट्स करून सुनयनाला शुभेच्छा दिल्या आहेत.(Kaushal Badrike Wife)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Madhurani Prabhulkar Story
Read More

‘तुझी खूप गरज आहे..’ म्हणत नेटकऱ्यांनी अरुंधतीला घातलं साकडं

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. असं असताना मालिकेत आता…
Prarthana Behere Career
Read More

सिनेसृष्टीमध्ये प्रार्थनाला १४ वर्ष पूर्ण-रेशीमगाठ च्या टीमने दिलं सरप्राईज

सिनेसृष्टीमध्ये येणं तिथे टिकून राहणं हा प्रवास सोपा नसतो. प्रेक्षकांचं मन जिंकणं म्हणजे जग जिकंण्यासारखं आहे.आणि आपले लाडके…
Prasad Khandekar Mother
Read More

“कधी कधी वैतागतो मी पण “आईसाठी प्रसादची खास पोस्ट

1 जून म्हणल कि सगळ्यांच्या स्टोरीज वर दिसतात ते अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. अभिनेता प्रसाद खांडेकरच्या आईचा…
Man Dhaga Dhaga Jodte Nava
Read More

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये उत्साहात साजरी होणार वटपौर्णिमा

मराठी सणांमध्ये अत्यन्त महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. खऱ्या आयुष्यात जसे हे सण साजरे केले जातात तसेच…