मराठी सिनेसृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांनी मराठी सिनेविश्वाबरोबरचं हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आहे. मराठी सिनेसृष्टीत छाप पाडल्यानंतर ही कलाकार मंडळी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच स्थान निर्माण करताना दिसत आहेत. यांत आता एक मराठमोळा अभिनेता हिंदी मालिकाविश्वाकडे वळला आहे. हा अभिनेता म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ फेम मालिकेतील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके. कुशल गेली अनेक वर्ष या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Kushal Badrike New Serial)
अभिनेता कुशल बद्रिकेने आजवर त्याच्या अभिनयाने व विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून कुशल नेहमीच प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेली अनेकवर्ष प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदाने रसिक प्रेक्षकांना कायमच खुर्चीत खिळवून ठेवलेलं पाहायला मिळालं. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारानेही प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अशातच आता कुशल एका वेगळ्या मालिकेतून प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाला आहे.
यानंतर आता मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर कुशल हिंदी मालिकेकडे वळला आहे. सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या विनोदी मालिकारून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोनी टीव्हीने याचा एका प्रोमो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन पोस्ट केला होता. त्यानंतर आता स्वतः कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “एका हिंदी मालिकेतून तुम्हाला हसवण्यासाठी येत आहे. तुमचं प्रेम व आशीर्वाद असू द्या”, असं त्याने म्हटलं आहे.
कुशलने ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव करायला सुरुवात केली आहे. कुशलने मराठी सिनेसृष्टीत जशी छाप पाडली तशी तो आता हिंदी सिनेसृष्टीतही पडणार का याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या आहेत. शिवाय अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला रामराम करणार का, याचीही सर्वत्र चर्चा सुरु आहे. अद्याप कुशलने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून एक्झिट घेणार की नाही, याची घोषणा केलेली नाही.