मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘त्या’ मुलाने राज कुंद्राला मिठी मारताच सुरक्षारक्षकाने जोरात खेचलं, शिल्पा शेट्टीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 17, 2024 | 7:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shilpa Shetty Video

Video : 'त्या' मुलाने राज कुंद्राला मिठी मारताच सुरक्षारक्षकाने जोरात खेचलं, शिल्पा शेट्टीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड सिनेसृष्टीतील बरेच कलाकार एरपोर्टवर पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसतात. ही कलाकार मंडळी कुठे जात आहेत, कोणाबरोबर आहेत याचे अपडेट ते नेहमीच देताना असतात. अशातच बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल नुकतंच एअरपोर्टवर स्पॉट होताना दिसलं. हे कायम चर्चेत असणार लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता राज कुंद्रा. शिल्पा व राज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. (Shilpa Shetty Video)

बॉलिवूडमधील एक काळ शिल्पाने गाजवला आहे. सोशल मीडियावर ही शिल्पा प्रचंड सक्रिय असते. फिटनेसबाबतचे अनेक अपडेट ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देताना दिसते. शिल्पाबरोबरचं तिचा पती राज कुंद्राही नेहमीच चर्चेत असतो. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर आरोप झाले. इतकेच नाही तर थेट जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली. राज कुंद्रा याला थेट पाॅर्न किंग देखील म्हटले गेले. पाॅर्न प्रकरणात नाव आल्यापासून सतत राज कुंद्रा हा मास्क घालून बाहेर स्पाॅट झाला. त्यानंतर अभिनेत्यावरील गुन्हे पुसल्यानंतर त्याने मास्क वापरणं बंद केलं.

आणखी वाचा – औषधांचा दुष्परिणाम, आजार वाढला अन्…; गोळ्यांनीच घेतला ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटचा जीव, नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही दिवसांपूर्वी शिल्पा व राज त्यांच्या कुटुंबियांसह परदेश दौरा करायला गेले होते. परदेश दौरा करुन परतल्यानंतर आता शिल्पा व राज कुंद्रा त्यांच्या मुलांसह एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी एका खास चाहत्याने राज कुंद्राची भेट घेतली. यावेळी त्या चाहत्याने राज कुंद्राला मिठीही मारली. त्यावर तेथील एका माणसाने राज यांच्या चाहत्याला ओढलं. हे पाहून शिल्पा शेट्टी भडकलेली दिसली. शिल्पा शेट्टीच्या त्या कृतीने साऱ्यांची मनं जिंकली आहेत.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर ईशा करणार राजकारणात प्रवेश?, हेमा मालिनी म्हणाल्या, “आमचा तिला पाठिंबा…”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या त्या कृतीचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. शिल्पा तिच्या कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करताना दिसते. यावेळी त्यांचं एकमेकांबरोबरचं बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळालं आहे.

Tags: entertainmentshilpa shettyshilpa shetty and raj kundraShilpa Shetty Videoshilpa shetty viral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Actress Pooja Sawant shared some special photos with her husband Siddhesh Chavan after an engagement

साखरपुड्यानंतर पूजा सावंतची होणाऱ्या नवऱ्याबरोबरची पहिली पोस्ट, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.