Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. अंबानींचा धाकटा लेक अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी सुरू असून सध्या जामनगर येथे लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत. या तीन दिवसांच्या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. हे कार्यक्रम थीमवर आधारित आहेत. पण रिहानाचा गाण्यांचा कार्यक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधले गेलेइंटरनेटवर सर्वत्रच रिहानाच्या परफॉर्मन्सची चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी परफॉर्मन्स दिल्यानंतर रिहाना पुन्हा आपल्या मायदेशी परतली.
शुक्रवारपासून अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली. पहिल्या दिवशी कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची थीम ‘अॅन इव्हिनिंग इन एव्हरलँड’ होती. यासाठी आलेले सर्वच सेलेब्रिटी खूप सुंदर दिसत होते. सर्वांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत व राधिका यांचेही फोटो व्हायरल होत आहेत. अनंतने काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता तर राधिकाने गुलाबी रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता. दोघांनीही मंचावर जाऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि आभारही मानले. तसेच आपल्या भावनाही अनंतने बोलून दाखवल्या.
आणखी वाचा – अक्षय कुमार लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करणार?, भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची शक्यता
याबरोबरच स्वतः मुकेश अंबानी यांनीही भावनात्मक भाषण केले. ते भाषण म्हणाले की, “मी माझा मुलगा अनंतला बघतो तेव्हा त्याच्यामध्ये मला माझे वडील धीरूभाई अंबानी यांची छबी दिसते. तसेच अनंत हा नेहमीच माझे वडील धीरूभाई यांचा लाडका राहील”, असे जेव्हा ते म्हणाले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. मुकेश अंबानी यांच्या भाषणानंतर ‘वनतारा’ शो सादर करण्यात आला. यामध्ये राधिकाची सासू म्हणजे खुद्द नीता अंबानी यांनीही परफॉर्मन्स केला आणि उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती खुश दिसत होती. विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येत होते. गायिका व फरहान अख्तरची बायको शिबानी दांडेकर-अख्तरनेही गाणं सादर केलं.तसेच या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींसहित फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स,गुगलचे सीइओ सुंदर पिचई हेदेखील उपस्थित होते.