बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीच्या डेटच्या चर्चांना बोनी कपूर यांनी दिला पूर्णविराम?, शिखर पहाडियाबरोबर दिसले पण…; नेमकं काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 12, 2024 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Boney Kapoor seen with janhvi Kapoor rumored boyfriend shikhar pahariya but refused to pose video viral

लेकीच्या डेटच्या चर्चांना बोनी कपूर यांनी दिला पूर्णविराम?, शिखर पहाडियाबरोबर दिसले पण...; नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सध्या तिचे नाव शिखर पहाडियाबरोबर जोडले जात आहे, कारण दोघेही अनेकदा काही कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले आहेत. नुकतीच ही जोडी हैद्राबादमधील एका मंदिरातही एकत्र दिसली होती. अशातच आता शिखर पहिल्यांदाच जान्हवीचे वडील बोनी कपूरबरोबर दिसला. मात्र बोनी कपूर यांनी तो माझ्याबरोबर नसल्याचे म्हटले.

बोनी कपूर यांनी नुकतीच त्यांच्या केसांवर उपचार केले. त्यांच्यावर हैद्राबादमध्ये हे उपचार झाले. त्यांनी स्वत: त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना माहिती दिली, मात्र नंतर त्यांनी तो व्हिडीओ डिलीट केला. यादरम्यान हैद्राबादमधून मुंबईत परतल्यावर बोनी कपूर हे मुंबई विमानतळावर शिखर पहाडियाबरोबर दिसले. यावेळी पापाराझींनी त्यांचे काही फोटोदेखील काढले.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यावेळी पापाराझींनी बोनी कपूर यांना शिखरबरोबर फोटो काढण्यासाठी विचारले असता, बोनी कपूर यांनी “तो माझ्याबरोबर नाही आहे, त्यामुळे त्याचे फोटो किंवा व्हिडीओ कुठे पोस्टही करु नका” असं म्हणाले. बोनी कपूर व शिखर पहाडिया यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – “एक-दोन वर्षात खूप चढ-उतार आले पण”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डा स्पष्टच बोलला, म्हणाला, “जे झालं ते…”

जान्हवी व शिखर यापैकी दोघांनीही अद्याप आपलं नातं अधिकृत केलेलं नाही. मात्र अनेकदा हे दोघे एकत्र दिसतात. याशिवाय अनेकदा जान्हवी शिखरबरोबर पार्टीला जाताना आणि एकत्र वेळ घालवताना दिसते. काही दिवसापूर्वी जान्हवीनं ‘कॉफी विथ करण सीझन ८’मध्ये शिखरचं नाव घेतलं होतं. तेव्हा पासून या दोघांच्या नात्याबद्दलच्या नेक चर्चांना उधाण आले आहे.  

आणखी वाचा – Video : भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, शाहरुख खानच्या पाया पडला अन्…; उपस्थितही भारावले

दरम्यान, बोनी कपूर यांची निर्मिती असलेला ‘मैदान’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर जान्हवी आगामी काळात ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘उलझन’, ‘आरसी १६’ व ‘देवारा : भाग १’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Tags: bollywood actorsBollywood entertainment newsbollywood newsBoney Kapoorentertainment newsJanhvi Kapoor rumored BoyfriendShikhar Pahariaजान्हवी कपूर बॉयफ्रेंडबॉलिवूड अभिनेतेबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीबोनी कपूरमनोरंजन बातमीशिखर पहाडिया
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Anisha padukone on ranveer singh

मावशी होणार हे कळताच दीपिका पदुकोणच्या बहिणीचं मोठं भाष्य, म्हणाली, “बाळाला बिघडविण्यात...”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.