शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नशा, प्रसिद्धीची हवा, मुलींच्या सवयीमुळे आई-वडील, बायकोलाही सोडल्याचं हनी सिंगचं भाष्य, म्हणाला, “गांजाहून घाणेरडी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood singer, musician and rapper Yo Yo Honey Singh commented on his Alcohol Cigarettes addictions.

“एका वेळी १२-१२ वेळा चरसची नशा करायचो”, नशा, प्रसिद्धीची हवा, मुलींच्या सवयींबद्दल हनी सिंहचं भाष्य

आपल्या रॉक, पॉप आणि रॅप गाण्यांवर तरुणाईला थिरकायला भाग पाडणारा गायक, संगीतकार व रॅपर म्हणजे ‘यो यो हनी सिंग’. हनी सिंहने आपला एक काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे हनी सिंगचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. आजवर त्याने अनेक लोकप्रिय व प्रसिद्ध गाणी देत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे आणि रसिक श्रोत्यांवरील या गाण्यांची मोहिनी कायम आहे. ‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी हनी सिंगने श्रोत्यांना मंत्रमुध केलं आहे. मात्र एकेकाळी यश, प्रसिद्धी व लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या हनी सिंहचे आयुष्य व्यसनाने उद्ध्वस्त केले. तो व्यसनांच्या इतका आहारी गेला होता की, यामुळे त्याला अनेक मानसिक व शारीरिक आजारांचाही सामना करावा लागला होता. (Honey Singh on his addictions)

या व्यसनाधीनतेबद्दल त्याने हनी सिंगन एक काही दिवसांपूर्वी लल्लनटॉपमध्ये भाष्य केलं होतं. याबद्दल बोलताना त्याने असं म्हटलं होतं की, “मी तेव्हा वोडकाबरोबरच चरसचेही व्यसन करणे सुरु केलं होतं. ती नशा गांजाहूनही अधिक हानिकारक आहे आणि मी दिवसातून १२-१२ वेळा त्याचे सेवन करायचो. लोकांनी फक्त दोन वेळा तरी त्याचे सेवन केलं तरी त्यांना त्रास होऊ शकतो. पण मी ती नशा दिवसातून १२-१२ वेळा करायचो. मी याचे खूपच व्यसन केले. इतकं केलं की, त्यामुळे माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. ज्या क्षणी सगळं काही उद्ध्वस्त झालं त्याचक्षणी मी ती नशा सोडली. लोकांना वाटतं की, व्यसनमुक्ती केंद्रात वगैरे गेलो. पण नाही. मला एखादे व्यसन सोडायला अजिबातच वेळ लागत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

आणखी वाचा – “बैलाने उचलून मला फेकलं आणि…”, रेश्मा शिंदेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्याने शिंगाने…”

यापुढे हनी सिंगने असं म्हटलं की, “मी तेव्हा इतका नशेत असायचो की, मला स्वतःचे किंवा माझ्या आजूबाजूचे काहीच भान नसायचे. त्याच काळात मी माझी पत्नी शालिनीपासून दूर जाऊ लागलो. २०११ च्या सुमारास माझे लग्न झाले. लग्नाचे ९-१० महिने सर्व काही ठीक होते. पण नंतर माझ्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली. आई-वडील, शालिनी, बहीण… मी कोणाशीही कसलाच संबंध ठेवला नाही. पैसा, प्रसिद्धी, व्यसनाधीनता आणि मुली यात मी हरवून गेलो होतो”.

आणखी वाचा – झी मराठीवर ‘तुला जपणार आहे’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमोमध्येच मृत व्यक्तीचा प्रेमळ वावर, नक्की काय?

दरम्यान, बॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर हनी सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा  चर्चेत राहिला. बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर, यशाची हवा डोक्यात गेली आणि हनी सिंगचं आयुष्य बदललं होतं. एकेकाळी तो अचानक गायब झाला होता. अशी एक वेळ आली की, हनी सिंग खूपच नैराश्येत होता. तो बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होता. त्यामुळे त्याने सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत केलं होतं.   

Tags: Honey SinghHoney Singh on his addictionsyo yo honey singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
20 December 2024 daily horoscope Friday is beneficial for new things.

20 December Horoscope : नवीन गोष्टी घेण्यासाठी शुक्रवारचा दिवस लाभदायक, तुमच्या नशिबात काय?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.